व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ आवश्यक
rat१७p९.jpg-
२५O११२७२
रत्नागिरी : फाटक हायस्कूलच्या क्रीडा महोत्सवात शपथ घेताना मुख्याध्यापक राजन कीर. सोबत डावीकडून पाटील, विद्यार्थी, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, मंदार सावंत आदी.
----
आवडीच्या खेळाशी नाते जोडा
महेश सावंत ः फाटक हायस्कूलचा क्रीडा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ आवश्यक असून, आवडीच्या खेळाशी नाते जोडा आणि खेळातून आनंद मिळवा, असे प्रतिपादन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत यांनी केले. फाटक हायस्कूल, श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य व त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी पाहुण्यांच्या उपस्थितीत खेळाडूंना क्रीडाशपथ देण्यात आली. मुख्याध्यापक राजन कीर यांनी विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करावे, असे सांगितले. उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये, शालेय स्वराज्य सभा मुख्यमंत्री आणि दोन्ही सत्रातील विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी व्यासपिठावर उपस्थित होते. या महोत्सवात कॅरम, व्हॉलीबॉल, कबड्डी, रस्सीखेच, खो-खो, ८० बाय ४ रिले अशा विविध वैयक्तीक आणि सांघिक खेळांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांना खेळात किंवा व्यवस्थापनात सहभागी करून घेण्याचे नियोजन क्रीडा विभागप्रमुख मंदार सावंत, क्रीडाशिक्षिका बेबीताई पाटील व अन्य क्रीडाशिक्षकांनी केले आहे. पंच म्हणून माजी विद्यार्थी व प्रशिक्षित पंचांना निमंत्रित करण्यात आले आहे. आरती पाथरे आणि अनिल आग्रे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश काटकर यांनी आभार मानले.

