११५५२
न्यायमूर्ती कडेठाणकर उद्या 
वकिलांना करणार मार्गदर्शन

११५५२ न्यायमूर्ती कडेठाणकर उद्या वकिलांना करणार मार्गदर्शन

Published on

११५५२
न्यायमूर्ती कडेठाणकर उद्या
वकिलांना करणार मार्गदर्शन
रत्नागिरी, ता. १८ : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू झाल्यानंतर नवीन वकिलांना मार्गदर्शन करण्याकरिता रत्नागिरी बार असोसिएशनने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये वकिलांना सर्किट बेंचमधील वकिलीच्या संदर्भातील आव्हाने याविषयी न्यायमूर्ती अजित कडेठाणकर मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी (ता. २०) दुपारी २.०० वाजता न्यायमूर्ती कडेठाणकर रत्नागिरी जिल्हा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. पैठणच्या जि. प. शाळेत शिकलेले आणि नामवंत वकील भगवानराव यांचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती कडेठाणकर यांना वाचनाचा छंद आहे. त्यातून त्यांनी बहुश्रुतता सांभाळली आहे. उच्च न्यायालयातील व कोल्हापूर खंडपीठातील वकिली व्यवसाय, व्यावसायिक शिस्त, न्यायालयीन कार्यपद्धती व अनुभवाधारित मार्गदर्शन न्यायमूर्ती कडेठाणकर करणार आहेत. जास्तीत जास्त वकिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी केले आहे.

११५९७
दीपक लढ्ढा यांना उत्कृष्ट विश्वस्त पुरस्कार
खेड ः तालुक्यातील मोरवंडे-बोरज गावातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन आणि ज्ञानदीप विद्यामंदिर भडगावचे विश्वस्त दीपक लढ्ढा यांना स्टार एज्युकेशन उत्कृष्ट विश्वस्त पुरस्कार प्राप्त झाला आहे. दीपक लढ्ढा हे शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असून आपल्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीत महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान असून होतकरु खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com