माजी विद्यार्थी मंडळातर्फे क्रीडा स्पर्धा

माजी विद्यार्थी मंडळातर्फे क्रीडा स्पर्धा

Published on

rat१९p१.jpg-
P२५O११७३९
रत्नागिरी : शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन कॅरम खेळातील स्ट्रायकरने करताना शिक्षणाधिकारी किरण लोहार, श्रीराम भावे, धनेश रायकर आदी.

क्रीडा स्पर्धांनी शिक्षकांमध्ये चैतन्य
अध्यापक महाविद्यालय ; माजी विद्यार्थी मंडळातर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षणाधिकारी किरण लोहार व भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे यांच्या हस्ते कॅरम खेळून स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. राजश्री देशपांडे, भारत शिक्षण मंडळाचे सचिव धनेश रायकर, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, विजय वाघमारे, विनायक हातखंबकर, डॉ. चरणदास कांबळे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा- ५०० मीटर चालणे पुरुष गट- ५० वर्षेखालील- विलास मुंढेकर, राजेश आयरे, दिनेश पवार. ५० वर्षेवरील- मारुती गलंडे, सुरेश सुवरे, अभिजित चव्हाण. महिला गट- ५० वर्षेखालील- मिथिला मोरे, नमिता वैद्य, अक्षता नलावडे. सांघिक स्पर्धा- व्हॉलीबॉल- पटवर्धन हायस्कूल, जिंदल हायस्कूल, गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय, गुहागर. क्रिकेट- संगमेश्वर तालुका, लांजा तालुका आणि पटवर्धन हायस्कूल. बुद्धिबळ- पुरुष गट- सचिन टोकले, मोतीलाल गावीत, प्रकाश अनगुडे. महिला गट- स्वाती नार्वेकर, नमिता वैद्य. कॅरम- पुरुष गट- रोशन जाधव, गणपती एडवी, गंगाराम गवाणकर. महिला गट- नमिता वैद्य, मिथिला मोरे. टेबल टेनिस- पुरुष गट- विनोद पिल्लई, श्रीपाद गुरव, उमेश दिवटे.
महिला गट- मिथिला मोरे, नमिता वैद्य, रजनी पेजे. सूर्यनमस्कार स्पर्धा- ५० वर्षाखालील पुरुष- राजेश आयरे, सचिन टोकले, माणिक भोये.५० वर्षेवरील पुरुष- विनायक जाधव, गणपती एडवी, मारुती गलंडे. १०० मी. धावणे- पुरुष गट ५० वर्षेखालील- ऋषभ खामकर, सचिन साळवी, उत्तम पवार. पुरुष गट ५० वर्षेवरील- अभिजित चव्हाण, विनायक जाधव, सुरेश सुवरे. स्त्री गट ५० वर्षेखालील- मिथिला मोरे, अक्षता नलावडे, नमिता वैद्य. स्त्री गट ५० वर्षेवरील- रजनी पेजे.

Marathi News Esakal
www.esakal.com