जानेवारीत खल्वायनतर्फे संगीत नाट्य महोत्सव

जानेवारीत खल्वायनतर्फे संगीत नाट्य महोत्सव

Published on

-rat१९p१६.jpg-
२५O११७९९
रत्नागिरी : खल्वायनतर्फे शुक्रवारी आयोजित संगीत नाट्य महोत्सवाची माहिती देताना मध्यभागी मनोहर जोशी. डावीकडे प्रदीप तेंडुलकर व उजवीकडे श्रीनिवास जोशी.
----
रत्नागिरीत खल्वायनतर्फे संगीत नाट्य महोत्सव
जानेवारीत मेजवानी; संशयकल्लोळ, शांतीब्रह्म, प्रीतिसंगम सादर होणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : खल्वायन संस्था आणि राष्ट्रीय कला केंद्र (एनसीपीए) मुंबई आणि सीएसआर पार्टनर सिटी यांच्या सहकार्याने सलग दुसऱ्या वर्षी संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २ ते ४ जानेवारीदरम्यान स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात संगीत संशयकल्लोळ, संगीत शांतीब्रह्म आणि संगीत प्रीतिसंगम या तीन नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत, अशी माहिती खल्वायनचे अध्यक्ष, दिग्दर्शक मनोहर जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या सभागृहात झालेल्या परिषदेला खल्वायनचे प्रदीप तेंडुलकर व खजिनदार श्रीनिवास जोशी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स ही भारतातील एक प्रमुख सांस्कृतिक संस्था आहे. संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट, साहित्य आणि छायाचित्रण कलाकृती सादर करण्यासाठी प्रयत्न करते. संस्था दरवर्षी ७००हून अधिक कार्यक्रम आयोजित करते. या अनुषंगाने रत्नागिरीत संगीत नाट्य महोत्सवासाठी त्यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
येत्या २ जानेवारीला संध्याकाळी ७ वा. मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन होईल. नंतर ५३व्या राज्य नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक आणि ६ वैयक्तिक पुरस्कार जिंकणारे ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक सादर केले जाईल. ३ जानेवारीला संध्याकाळी ७ वा. रत्नागिरीतील नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित ‘संगीत शांतीब्रह्म’ हे नाटक सादर होईल. या नाटकाने ४२व्या राज्य नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक आणि १० वैयक्तिक पुरस्कार जिंकले आणि नवी दिल्ली येथे दुसरे स्थान पटकावले आहे. महोत्सवात ४ जानेवारीला संध्याकाळी ७ वा. प्रल्हाद केशव अत्रे लिखित प्रसिद्ध संगीत नाटक ‘संगीत प्रीतिसंगम सादर होईल. संत सखू यांच्या जीवनावर आधारित हे एक उत्कृष्ट नाटक आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ कलाकारांचे दमदार सादरीकरण आणि मधुर गाणी गाणारे नवीन, उत्साही कलाकार आहेत. तिन्ही संगीत नाटके मनोहर जोशी यांनी दिग्दर्शित केली आहेत. त्यात रत्नागिरी, चिपळूण आणि देवगड भागातील प्रसिद्ध तरुण कलाकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com