म्हापण येथे रक्तदान शिबीर
कुडाळ येथे उद्या
दिनदर्शिका प्रकाशन
कुडाळः जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, कुडाळच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रविवारी (ता.२१) दुपारी ३ वाजता कुडाळ हायस्कूल नजीक मराठा समाज हॉल येथे संत रविदास दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळा तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कवी मधुकर जाधव यांच्या हस्ते, प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव तसेच चंद्रसेन पाताडे, नामदेव जाधव, सौ. मनिषा पाताडे, नरेंद्रकुमार चव्हाण, गुरुनाथ तेंडोलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य, सल्लागार, मार्गदर्शक, समाज बांधवांनी वेळीच उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात येत आहे.
---------------
सावंतवाडी येथे
उद्या भजन संध्या
सावंतवाडीः आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) सावंतवाडी यांच्यावतीने रविवारी (ता.२१) सायंकाळी पाच ते नऊ या वेळात राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला इस्कॉनचे गुरु महाराज परमपूज्य लोकनाट स्वामी महाराज व अमेरिकन संन्यासी परमपूज्य श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज यांचे प्रवचन होणार आहे तसेच श्रीमान सुवर्ण गोपाळ प्रभू जी. नोएडा यांचे कीर्तन होणार आहे. भजन कीर्तन नाटिका व महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. सावंतवाडीतील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
---------------
म्हापण येथे
रक्तदान शिबीर
म्हापणः रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानत शुक्रवारी (ता.२६) सकाळी ९ वाजता येथील डॉ. दिपक ठाकूर यांच्या दवाखान्यात रिक्षा चालक मालक संघटना म्हापण पाट व पिंपळपार मित्र मंडळ म्हापण पाट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------
आनंदा बामणीकर
पंच परीक्षेत द्वितीय
दोडामार्ग ः येथील इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेजचे राज्य शासन पुरस्कारप्राप्त शिक्षक आनंदा बामणीकर यांनी जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला. राज्य कबड्डी असोशिएन संलग्नित सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनतर्फे आयोजित या परीक्षेत जिल्ह्यातून ४१ विद्यार्थी सहभागी झाले होते. लेखी व प्रात्यक्षिक अशा द्विस्तरीय परीक्षेत बामणीकर यांनी उत्कृष्ट कौशल्य, नियोजनबद्धता दाखवत गुणवत्ता सिद्ध केली. संस्थाध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
-----------------
दोन रस्ता कामांचा
कनेडी येथे शुभारंभ
कनेडीः कणकवली, हरकुळ बुद्रुक, कोटेश्वर, कनेडी बाजारपेठ ते फोंडा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण तसेच कनेडी बाजारपेठ ते रोझरी चर्च भिरवंडेकडे जाणारा रस्ता अशा एकूण ८ कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या दोन रस्ताकामांचा शुभारंभ नुकताच झाला. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, संजना सावंत यांच्या उपस्थितीत सांगवे सरपंच संजय सावंत यांच्या हस्ते या कामांचा श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला. फादर आनंद, डॉ. पास्कू फर्नांडिस, प्रफुल्ल काणेकर, मयुरी मुंज, राजेश सापळे, मंगेश बोभाटे, राजेंद्र सावंत, संतोष सावंत, संजय सावंत, अशोक कांबळे, श्रीकांत सावंत, स्यांडू सावंत, भालचंद्र सावंत, बाबू वाळके, प्रसाद पेंडुरकर आदी उपस्थित होते.
-----------------
वेंगुर्ले वाचनालयातर्फे
बक्षिसांसाठी आवाहन
वेंगुर्लेः येथील नगर वाचनालयातर्फे वर्षा विश्राम किनळेकर यांच्या कायम निधीतून (कै.) रामचंद्र विश्राम किनळेकर आणि (कै.) मंदाकिनी रामचंद्र किनळेकर स्मृती हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी पारितोषिके २०२३-२४ पासून देण्यात येत आहेत. यासाठी तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये आठवी ते बारावीत शिकणाऱ्या हुशार, होतकरू ज्यांची शिक्षण, कला, क्रीडा क्षेत्रात शाळेत विशेष चमक आहे, अशा एक किंवा दोन विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी ही पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्यांची नावे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी २४ डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत संस्थेकडे पाठवावीत. अधिक माहितीसाठी यावर संपर्क साधावा.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

