रत्नागिरी जिल्ह्यात १९ हजार ०६९ भटकी कुत्री

रत्नागिरी जिल्ह्यात १९ हजार ०६९ भटकी कुत्री

Published on

रत्नागिरी जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा विस्फोट
जिल्हा परिषद पशू जनगणनेत १९ हजारची नोंद ; निर्बिजीकरणाची जबाबदारी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने २०२४ मध्ये केलेल्या पशू जनगणनेमध्ये जिल्ह्यात १९ हजार ६९ भटकी कुत्री असल्याची नोंद आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवणे मोठे आव्हान प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे. चिंता वाढवणारी ही आकडेवारी असून, रत्नागिरी आणि दापोली तालुक्यात सर्वांत जास्त भटकी कुत्री असल्याची नोंद आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने ही माहिती दिली. या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची आणि निवाराशेडची जबाबदारी आता जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यांवर पडणार आहे.
ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या कुत्र्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवायचे कसे, हा गंभीर प्रश्न आहे. विशेषत: शहरालगतच्या गावांमध्ये विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. यामुळे अपघातांचे व श्वानदंशाचे प्रमाणही वाढत आहे. काही महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यशासनाने जिल्हा परिषद व पंचायत समितीला दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत २०२४ मध्ये पशूजनगणना झाली. यामध्ये जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. गावातील भटक्या कुत्र्यांची नोंद ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ठेवायची आहे.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दिलेल्या माहितीमध्ये मंडणगड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीमध्ये १६१७ भटकी कुत्री आहेत. दापोलीत १०६ ग्रामपंचायतीमध्ये ३६६८ कुत्री, खेडमध्ये ११४ ग्रामपंचायतीत २४११, चिपळूणमध्ये १३० ग्रामपंचायतीमध्ये २५५९, गुहागरमध्ये ५५ ग्रामपंचायतीत १४०९, संगमश्वरमध्ये १२७ ग्रामपंचायतीमध्ये ६६९, रत्नागिरीतील ९४ ग्रामपंचायतीमध्ये ३८४४, लांजातील ६० ग्रामपंचायतीमध्ये ७४७ आणि राजापुरातील १०१ ग्रामपंचायतीमध्ये २०४५ अशा एकूण ८४७ ग्रामपंचायतीमध्ये १९ हजार ६९ भटकी कुत्री असल्याची नोंद जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे.
---
निवाराशेडची सुविधा
जिल्ह्यात लवकरच या मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने राबवली जाणार आहे. निर्बिजीकरण झाल्यानंतर किमान सहा ते सात दिवस त्यांना निवाराशेड उभारून ठेवावे लागणार आहे. यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रश्नही आता उपस्थित राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com