रक्तदानातून सामाजिक ऐक्याला बळ
12017
रक्तदानातून सामाजिक ऐक्याला बळ
प्रा. अरुण मर्गज ः कुडाळात रक्तदान शिबिरास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः रक्तदान ही काळाची गरज ओळखून प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. यानिमित्ताने एक सामाजिक कार्याचा साक्षीदार होण्याची संधी रक्तदानातून मिळेल, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे प्राध्यापक अरुण मर्गज यांनी केले. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हिर्लोक राणेवाडी येथील मालती मोहन राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील मराठा समाजाच्या सभागृहात रक्तदान शिबिर तसेच सामाजिक उपक्रमांतर्गत संविता आश्रम पणदूर येथे साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रक्तदान शिबिराचे उद्घाटन मालती राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मोहन राणे, लक्ष्मीकांत सावंत, माजी निवृत्त केंद्रप्रमुख भास्कर पूरळकर, भाग्यश्री पुरळकर, आनंद नवार, विजय सावंत, अनंत राणे, जिल्हा ग्रामीण रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी भारती ठोंबरे, नीता आरोलकर, भूषण मळेकर, ऋतुजा हरमलकर, कांचन परब, गणपत गाडगे, प्रथमेश घाडी आदी उपस्थित होते.
प्रा. मर्गज म्हणाले, ‘मालती राणे यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा त्यांच्या परिवाराने आयोजित करून सर्वांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम केला आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर व वृद्धाश्रमांना मदत हा सामाजिक उपक्रम अनंत राणे आणि त्यांच्या परिवाराने उत्तमरित्या आयोजित केला. आजच्या धकाधकीच्या जीवनात रक्तदान ही काळाची गरज बनली आहे. गरजूंना रक्तदान देऊन त्याचे प्राण वाचवता येतात, हाच दृष्टिकोन ठेवून रक्तदानासारखा आरोग्य विषयक उपक्रम प्रत्येकाने राबवला पाहिजे. आपण दिलेल्या रक्ताने दुसऱ्याचा जीव वाचतो, यातच रक्तदानाचे मोठे कार्य आहे.’ अनंत राणे यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर गाड यांनी निवेदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

