-तीन जिल्ह्यात ७० हजार मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट

-तीन जिल्ह्यात ७० हजार मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट
Published on

-rat२०p८.jpg-
P२५O१२०२५
रत्नागिरी ः मोफत आरोग्य शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत. शेजारी मंगेश चिवटे, डॉ. आशुतोष सिंग, डॉ. पूजा सिन्हा, डॉ. जयप्रकाश रामानंद, राहुल पंडित, बाबू म्हाप आदी.
----
तीन जिल्ह्यात ७० हजार शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट
उदय सामंत ः मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४.५ कोटींची मदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल साडेचार कोटी रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली. जिल्ह्याचा कोणताही नागरिक उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील ७० हजार मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे मोठे उद्दिष्ट आम्ही घेतले आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे, अथायू हॉस्पिटल कोल्हापूर, उदय सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्‍घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष सिंग, डॉ. पूजा सिन्हा, विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे मंगेश चिवटे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप आदी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, माणुसकीच्या नात्याने नेहमी काम करत आलो आहे. माझ्या नावाच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून माझे सर्व सहकारी दिवस-रात्र कष्ट करत आहेत. ही टीम मालक-नोकर म्हणून नाही तर एक कुटुंब म्हणून काम करत आहे म्हणूनच गेल्या काही दिवसांमध्ये ८९ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करणे शक्य झाले; परंतु त्याचा आम्ही कधीच गाजावाजा केलेला नाही.
---
चौकट
अधिष्ठाता-शल्यचिकित्सकांना चिमटा
रत्नागिरीतील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांना उद्देशून उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यात जास्तीत जास्त आणि चांगल्या दर्जाच्या शस्त्रक्रिया झाल्या पाहिजेत; परंतु कमीत कमी शस्त्रक्रिया झाल्या पाहिजेत. कमी शस्त्रक्रिया झाल्या म्हणजे माझ्या रत्नागिरीकरांचे आरोग्य उत्तम आहे, हा संदेश गेला पाहिजे. अधिष्ठाता मोठे की, जिल्हा शल्यचिकित्सक मोठा यात न पडता मी तुमच्यापेक्षा मोठा आहे, हे लक्षात ठेवा आणि नागरिकांसाठी चागंले काम करा, असा चिमटा त्यांनी काढला.
---
चौकट
तरी फरक पडत नाही
रत्नागिरीत रविवारी (ता. २१) वेगळेच चित्र असेल. रत्नागिरीकर माझ्या पाठीशी किती खंबीरपणे उभा आहे, ते उद्या पालिकेच्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. नगराध्यक्ष आमचाच असेल, अनेकांचे मनसुबे धुळीस मिळतील. आजपर्यंत अनेकवेळा माझ्याआड काळी मांजरे आली तरी त्याने काही फरक पडणार नाही आणि आताही काही फरक पडणार नाही. कारण, रत्नागिरीचा विकास हाच आमचा ध्यास आहे, अशी राजकीय कोपरखळी सामंत यांनी हाणली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com