शिंदे शिवसेना वेंगुर्ले निरीक्षक विद्याधर परब यांचे अभिनंदन

शिंदे शिवसेना वेंगुर्ले निरीक्षक विद्याधर परब यांचे अभिनंदन

Published on

swt242.jpg
13085
सावंतवाडीः वेंगुर्ले निरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या विद्याधर परब यांची पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना जिल्हाप्रमुख संजू परब. सोबत इतर.

शिंदे शिवसेना वेंगुर्ले निरीक्षक
विद्याधर परब यांचे अभिनंदन
सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. २४ः आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक विद्याधर परब यांची वेंगुर्ले निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
त्यांचे ​शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिल्हाप्रमुख परब यांनी आज अधिकृतपणे या निवडीची घोषणा केली. ही नियुक्ती आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ​श्री. परब म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपूर्वी पालिका निवडणुका पार पडल्यानंतर येथील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त केली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवनियुक्त निरीक्षक परब हे संबंधित मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतील.​ त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार, वेंगुर्ले येथे पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com