गुरुकुलच्या संस्कारांमुळे विद्यार्थी अष्टपैलू

गुरुकुलच्या संस्कारांमुळे विद्यार्थी अष्टपैलू

Published on

rat२४p१.jpg-
P२५O१३०२४
रत्नागिरी : संजीवन गुरुकुलामध्ये गुरूवर्य रामचंद्र जोग स्मृतिदिन कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी शाळेला स्नेहभेट दिली. भेट स्वीकारताना गुरुकुल प्रबंधक मनाली नाईक व सर्व शिक्षक, मागे उभे संस्था पदाधिकारी.
----
गुरूकुलच्या संस्कारांमुळे विद्यार्थी बनले अष्टपैलू
दीपा सावंत ः गुरुवर्य रामचंद्र जोग यांचा स्मृतिदिनी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : गुरुवर्य रामचंद्र जोग यांनी दूरदृष्टीमुळे पटवर्धन हायस्कूलमध्ये गुरुकुल शिक्षणपद्धती सुरू झाली. त्यांच्या शिकवणीमुळे मुले आज समृद्ध जीवन जगत आहेत. कोणत्याही अडचणीच्यावेळी डगमगत नाहीत, शाळेसाठी मदत करण्याची भावना त्यांच्यात आहे, विद्यार्थी अष्टपैलू झाले, हे सर्व संजीवन गुरूकुलचे संस्कार आहेत, असे प्रतिपादन डाएटच्या अधिव्याख्यात्या दीपा सावंत यांनी केले.
पटवर्धन हायस्कूलच्या संजीवन गुरुकुलामध्ये गुरूकुलचे संस्थापक (कै.) गुरुवर्य रामचंद्र जोग यांच्या १२व्या स्मृतिदिन कार्यक्रम आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त विनायक हातखंबकर, सुनील वणजू, चंद्रकांत घवाळी, विजय वाघमारे, संजीवन गुरूकुलचे माजी प्रबंधक जाधव, हरी करमरकर, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर उपस्थित होते. गुरूकुलच्या प्रबंधक मनाली नाईक यांनी प्रास्ताविकामध्ये पंचकोश विकसन संकल्पना आणि गुरुवर्य जोग यांची शैक्षणिक दूरदृष्टी कशी होती, हे सांगितले.
स्मृतिदिनाप्रीत्यर्थ ‘प्रश्नमंजूषा’ स्पर्धेच्या विजेते अनुक्रमे प्रथम फाटक हायस्कूल, द्वितीय जीजीपीएस आणि तृतीय फणसोप हायस्कूल यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. आदर्श विद्यार्थी आणि होतकरू विद्यार्थी यांना गौरवण्यात आले. गुरुकुलामधील आदर्श शिक्षक म्हणून दिनेश मोहिते आणि प्रज्ञा पवार यांना शशिकांत सरपोतदार स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीराम भावे यांनी जोग यांचे शैक्षणिक कार्य सांगितले. गुरुकुलामधील विद्या घडशी यांनी आभार मानले.
---
माजी विद्यार्थी संघाची स्थापना
माजी विद्यार्थ्यांमधून माजी विद्यार्थीसंघ स्थापन करण्यात आला. या संघांच्या अध्यक्षा म्हणून श्रीनिधी सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरुकुलामधील शिक्षकांनी मेहनत घेतली. माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यासाठी आलेल्या डॉ. कोमल भावे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात गुरुवर्य जोग यांच्या आठवणी व गुरुकुलामधील त्यांचे शालेय अनुभव कथन केले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला रोख रक्कम आणि प्रोजेक्टर स्क्रीन स्नेहभेट म्हणून दिली आणि गुरुकुलसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची आनंदाने तयारी दर्शवली.

Marathi News Esakal
www.esakal.com