एनएसएसच्या मुलींचे निवासी शिबिर

एनएसएसच्या मुलींचे निवासी शिबिर

Published on

- rat24p14.jpg-
P25O13090
रत्नागिरी ः शहराजवळील शिरगाव येथील महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या एनएसएसच्या निवासी शिबिरातील विद्यार्थिनी.
---
शिरगावात पर्यावरणपूरक शिबिर
‘महर्षी कर्वे’मधील एनएसएसचा सहभाग ; विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. 24 ः शहराजवळील शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे शिरगाव येथे सात दिवसीय निवासी शिबिर उत्साहात झाले.
निवासी शिबिरासाठी युथ फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट- स्पेशल फोकस ऑन वॉटरशेड मॅनेजमेंट अॅण्ड वेस्टलॅण्ड डेव्हलपमेंट असा विषय देण्यात आला आहे. या विषयाच्या अनुषंगाने पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन, आरोग्य, स्वच्छता व सामाजिक जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. शिबिरावेळी एनएसएस स्वयंसेविकांनी श्रमदानातून जलस्वच्छता, वनराई बंधारा बांधणीसारखे उपक्रम यशस्वीपणे राबवले. यामुळे जलसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभवातून समजले. या शिबिरात विविध विषयांवरील अभ्यासकांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. ई-वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर मनीष आपटे (फाउंडर-रत्नाग्रीन टेक्नो सर्विसेस) यांनी व्याख्यान दिले. ऑरगॅनिक फार्मिंग या विषयावर कृषी अधिकारी गावडे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व स्पष्ट केले. आरोग्यविषयक जाणीव निर्माण करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे डोळे तपासणी व रक्त चेक तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे स्वयंसेविकांना आरोग्य तपासणीचे महत्त्व समजले. सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतर्गत हळदीकुंकू समारंभावेळी एनएसएस स्वयंसेविकांनी जाकडी नृत्य, जोगवा, योगा डान्स, गरबा तसेच समूहगीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी शिरगाव ग्रामपंचायत सरपंच फरिदा काझी, ग्रामसेवक उल्हास कोळी, रत्नागिरी प्रकल्प समितीचे सदस्य यांचे सहकार्य लाभले. या शिबिरासाठी रत्नागिरी प्रकल्प अध्यक्षा विद्या कुलकर्णी, प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई, बीसीए कॉलेजच्या प्र. प्राचार्या स्नेहा कोतवडेकर यांनी एनएसएस स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com