-विष्णू परीट यांचे जलचित्र देशपातळवीर

-विष्णू परीट यांचे जलचित्र देशपातळवीर

Published on

-rat२४p२०.jpg-
२५O१३१११
विष्णू परीट
-rat२४p२१.jpg-
२५O१३११२
संगमेश्वर ः विष्णू परीट यांनी काढलेले सुंदर चित्र.
----
विष्णू परीट यांचे जलचित्र झळकणार देशपातळीवर
आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे प्रदर्शनासाठी निवड ; १०८ वर्षांची परंपरा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ ः गेली ४० वर्षे जलरंगात काम करणारे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील प्रथितयश चित्रकार विष्णू परीट यांच्या जलरंग चित्राची निवड आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे आयोजित चित्र प्रदर्शनासाठी केली आहे. या यशाबद्दल चित्रकार विष्णू परीट यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ही देशस्तरावरील संस्था कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील विविध भागात अनेक उपक्रम राबवत असते. देशातील चित्रकारांकडून चित्र-शिल्प यांची छायाचित्र मागवून त्यातून उत्तम कलाकृतींची निवड केली जाते. या सर्व कलाकृतीचे प्रदर्शन दरवर्षी मुंबई येथे भरवले जाते. नवीन वर्षात हे प्रदर्शन भरणार असून यावर्षी या प्रदर्शनाचे हे १०८ वे वर्ष आहे. या प्रदर्शनात विष्णू परीट यांच्या जलरंग कलाकृतीची निवड झाली आहे.
विष्णू परीट हे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे विद्यामंदिर येथे ३६ वर्षे कलाशिक्षक म्हणून सेवेत होते. मूळ इचलकरंजी जवळच्या कबनूर येथील विष्णू परीट यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळत असताना छंद म्हणून जलरंगात निसर्गचित्रं रेखाटण्यास सुरुवात केली. दररोज एक याप्रमाणे कलाकृती साकारत असताना त्यांनी जलरंगावर प्रभुत्व मिळवले.
गतवर्षी त्यांच्या चित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे उत्कृष्ट कलाकृतीचे पारितोषिक राज्यपाल यांच्या हस्ते प्राप्त झाले आहे.
आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने विष्णू परीट यांच्या कलाकृतीची प्रदर्शनासाठी निवड केल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, सह्याद्री कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव, इचलकरंजी कला महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील, चित्रकार अमित सुर्वे, रुपेश सुर्वे, प्रदीप देडगे, अवधूत खातू, विक्रांत बोथरे, मिरज कला महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत होळकर, चित्रकार मनोज सुतार, श्रीरंग मोरे, दत्ता हजारे, सतीश सोनवडेकर, विक्रांत दर्डे, प्राध्यापक धनंजय दळवी आदींनी अभिनंदन केले आहे.
----------
कोट
आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने निवडलेले चित्र जयगड खाडीतील असून शांत जलाशयावर तरंगणारी होडी हे माझ्या जीवन प्रवासाचे प्रतीक आहे. कधी स्थिर, कधी प्रवाहासोबत वाहणारे जीवन या होडीप्रमाणेच असते. आकाशातील सौम्य निळसर करड्या रंग छटा आणि दूरवर पसरलेला किनारा अंतर्मुखतेची भावना निर्माण करतो. रंगाच्या मृदू छटांमधून मी शांतता, आशा आणि एकाकीपणातील सौंदर्य दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.

-- विष्णू परीट, चित्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com