सावंतवाडीत आज पुरस्कार वितरण

सावंतवाडीत आज पुरस्कार वितरण

Published on

सावंतवाडीत आज
पुरस्कार वितरण
सावंतवाडीः येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा उद्या (ता.२५) सकाळी साडे दहा वाजता येथील श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. याच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उद्घाटक म्हणून गजानन नाईक तर प्रमुख पाहुणे सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, सी. ए. लक्ष्मण नाईक, अभिमन्यू लोंढे, आरपीडीच्या मुख्याध्यापिका सांप्रवी कशाळीकर, कवी विठ्ठल कदम आदी उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्ञानदीप विकास मंडळातर्फे कवयित्री स्नेहा कदम, माणगाव, शुभेच्छा सावंत बांदा, मंदार चोरगे वैभववाडी, सचिन वंजारी कणकवली, राजाराम फर्जद दोडामार्ग, शैलेश तांबे वेंगुर्ले, रोहन पाटील दाणोली, राजेश कदम देवगड, कांचन उपरकर सावंतवाडी, अविनाश म्हापणकर सावंतवाडी यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक वाय पी नाईक, अध्यक्ष जावेद शेख खजिनदार शामराव मांगले, कार्याध्यक्ष नीलेश पारकर, सहसचिव विनायक गावस यांनी केले आहे.
..........................
वक्तृत्व स्पर्धेत
रिया परब प्रथम
वेंगुर्लेः नगर वाचनालय आयोजित ‘सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत’ स्वामी विवेकानंद व स्वा. सावरकर तालुका वक्तृत्व स्पर्धेत रिया परब हिने प्रथम क्रमांक पटकाविला. आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद व स्वा. सावरकर यांच्या साहित्यावर वक्तृत्व स्पर्धा संस्थेच्या लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात झाली. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. पहिल्या ते सातवी गटात प्रथम क्रमांक रिया परब (बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय), द्वितीय वरदा वेंगुर्लेकर (रा. कृ. पाटकर हायस्कूल), तृतीय यश सावंत (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), उत्तेजनार्थ वेदिका कुडव (सरस्वती विद्यालय आरवली-टांक) यांनी पटकाविला. आठवी ते बारावी गटात द्वितीय क्रमांक वैभवी चिपकर (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), तृतीय प्राची आरोलकर (सरस्वती विद्यालय आरवली - टांक), उत्तेजनार्थ प्रणाली गवंडे (स्कूल उभादांडा). परीक्षक म्हणून कैवल्य पवार, दीपराज बिजितकर, महेश बोवलेकर यांनी काम पाहिले. विजेत्यांना १८ जानेवारीला गौरविण्यात येईल.
........................
केशव खांबल
यांचा सत्कार
सातार्डाः सातार्डा, आरोस धनगरसडा येथे अतिदुर्गम भागात दोडामार्ग - कसई येथील श्री सिद्धेश्वर दशावतार मंडळाने नाट्यप्रयोग सादर केल्याने आरोस सरपंच शंकर नाईक यांच्या हस्ते सिद्धेश्वर दशावतार कंपनीचे मालक केशव खांबल यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आरोस पोलीस पाटील महेश आरोसकर, श्रीकांत कोकरे, रमेश येडगे, श्यामु झोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. खांबल यांना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. सातार्डा, आरोस गावांच्या अतिदुर्गम धनगरसडा भागातील ग्रामस्थांशी चांगले संबंध आहेत. अतिदुर्गम भागात दशावतार नाट्यप्रयोग सादर करावा या इच्छेने सातार्डा, आरोस गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी नाट्यप्रयोग करण्याची संधी मिळाल्याने आनंद आहे, असे खांबल म्हणाले. सिद्धेश्वर मंडळाने ‘चौरंगीनाथ’ नाट्यप्रयोग सादर केला. संवादिनी साथ रोहन चव्हाण, गीतेश कांबळे यांनी पखवाज, झांजवादक शुभम मसुरकर यांनी दिली.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com