कोकण
संक्षिप्त
कबनूरकर स्कूलला
विनय सहत्रबुद्धेंची भेट
साखरपा ः येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रोबोटिक आणि एआय तंत्रज्ञानाची प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या लॅबची माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी भेट देऊन पाहणी केली. शाळेचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर यांनी विनय सहस्रबुद्धे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. चतुरंग प्रतिष्ठानचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार मिळवणारी विद्यार्थिनी स्वरा संतोष पांगळे हिचा सत्कार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. ग्रामीण भागात विज्ञान तंत्रज्ञान यांचे प्रशिक्षण मिळत असेल तर असे विद्यार्थी शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा कुठेही मागे राहणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

