राजापूर-रायपाटणमधील विचित्र अपघातात महिला ठार
१३१९९
दुचाकीवरील वृद्धा
ट्रकखाली चिरडून ठार
रायपाटणला विचित्र अपघात : दुचाकीची मोटारीला धडक
राजापूर, ता. २४ : तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवारी (ता. २४) सकाळी दहाच्या सुमारास दुचाकी आणि मोटारीची धडक होताच दुचाकीवरून पडलेल्या महिलेच्या अंगावरून मागून येणाऱ्या ट्रकचे चाक गेल्याने वृद्धा ठार झाली. पार्वती तानू तरळ (वय ७५, रा. शिवणे बुद्रुक) असे मृत महिलेचे नाव आहे.
पुणे-पिंपळे सौदागर येथील रहिवासी तेजस शेलार मोटारीने (एमएच १४ मएल ९६१८) पुणे येथून कुणकेश्वर येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यांच्या मोटारीत लहान मुले व इतर कुटुंबीय होते. रायपाटण टक्केवाडी येथे त्यांची मोटार आली असता पाचल गुरववाडी येथील दुचाकीस्वार कुणाल धावडे याने मोटारीला मागून धडक दिली. यामुळे दुचाकीवर मागे बसलेल्या पार्वती तरळ रस्त्यावर पडल्या. याच वेळी रत्नागिरीहून पाचलच्या दिशेने संतोष सिद्धार्थ सावंत मालवाहू ट्रक (एमएच ०८ एक्यू ७२६६) घेऊन जात होते. त्यावेळी रस्त्यावर पडलेल्या पार्वती यांच्या अंगावर ट्रक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कमलाकर पाटील, कॉन्स्टेबल नीलेश कात्रे आणि रामदास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांसह रायपाटण टक्केवाडीच्या पोलिसपाटील मृण्मयी पांचाळ आणि गांगणवाडीचे पोलिसपाटील स्वप्नील गांगण आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

