वक्तृत्व म्हणजे आशय मांडण्याचे अभ्यासपूर्ण तंत्र
swt263.jpg
13536
प्रा. वैभव खानोलकर
वक्तृत्व म्हणजे आशय
मांडण्याचे अभ्यासपूर्ण तंत्र
प्रा. खानोलकर ः तुळसमध्ये स्पर्धेस प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः वक्तृत्व म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून कमीत कमी शब्दांत प्रभावी आणि अभ्यासपूर्ण आशय मांडण्याचे ते एक तंत्र आहे. वक्त्याने आत्मविश्वासपूर्ण बोलणे, आवाजातील चढ-उतार आणि योग्य संदर्भासह दाखले देण्याचे कसब आत्मसात करायला हवे. पालकांनी आपल्या मुलांना केवळ बक्षीस मिळवण्यासाठी तयार न करता, उत्तम वक्ता बनविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. वक्तृत्व स्पर्धेचा अनुभव माणसाला अधिक समृद्ध करतो, असे प्रतिपादन युवा व्याख्याते आणि लोककला अभ्यासक प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित शिवाजी विद्यालय तुळस येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ते परीक्षक म्हणून बोलत होते. वेताळ प्रतिष्ठानच्या वक्तृत्व स्पर्धेचा विजेता ते आज त्याच स्पर्धेचा परीक्षक असा आपला थक्क करणारा प्रवास यावेळी प्रा. खानोलकर यांनी उपस्थितांसमोर मांडला. शालेय जीवनापासूनच एक उत्तम वक्ता म्हणून त्यांनी गोवा आणि महाराष्ट्रातील विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावले आहेत. त्यांना राज्यभरात आणि विद्यापीठ स्तरावर तज्ज्ञ परीक्षक म्हणून निमंत्रित केले जाते. एक उपक्रमशील प्राध्यापक म्हणूनही त्यांची विशेष ख्याती आहे. लोककला अभ्यासक आणि सुप्रसिद्ध निवेदक म्हणून त्यांची ओळख आहे.
यावेळी प्रा. खानोलकर यांनी वेताळ प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला. वेताळ प्रतिष्ठान ही केवळ एक सामाजिक संस्था नसून कला, क्रीडा आणि सांस्कृतिक व्यासपीठ देणारी महाराष्ट्रातील एक चळवळ आहे, असे त्यांनी सांगितले. व्यासपीठावर श्री. खवणेकर, श्री. पेडणेकर, प्रा. वामन गावडे, डॉ. प्रा. धुरी, श्री. आडेलकर, सौ. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

