राजापूर-शेकडो वर्षापूर्वीच्या धुतपापेश्वर मंदिराला नवा साज
rat26p24.jpg-
13590
राजापूर ः धूतपापेश्वर मंदिरात कोरीव नक्षीकाम केलेले सभागृहातील लाकडी खांब.
rat26p25.jpg-
13591
आकर्षक धूतपापेश्वर मंदिर.
rat26p26.jpg-
13592
धूतपापेश्वर मंदिराजवळ असलेला धबधबा.
---------
धूतपापेश्वर मंदिराला नवा साज
शेकडो वर्षापूर्वीच्या मंदिराचे जतन-संवर्धन पूर्णत्वाकडे; ११ कोटी रुपये खर्च, पर्यटकांची गर्दी
राजेंद्र बाईत- सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ ः प्राचीन मंदीरांच्या जतन-संवर्धन आणि परिसर विकास कार्यक्रमांतर्गत राजापूरचे आराध्यदैवत श्री धूतपापेश्वरचे प्राचीन मंदिर आणि परिसराचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे या प्राचीन मंदिराला नवा सुशोभीकरणाचा साज चढला आहे. वैशिष्ट्यपूर्ण आणि विलोभनीय परिसर लाभलेल्या या मंदिराचे अनोखे सौंदर्य ११ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या सुशोभीकरणाने धूतपापेश्वर मंदिराकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.
चौकट
श्री धूतपापेश्वरचे प्राचीन मंदिर
मृडानी नदीच्या काठावर धोपेश्वर येथे श्री धूतपापेश्वरचे प्राचीन अन् पुरातन मंदिर शेकडो वर्षापूर्वी बांधण्यात आले आहे. जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि मंदिराच्या गाभार्यातील लाकडी बांधकामासह या ठिकाणचे उभे खांबांवरील कोरीव काम त्या काळातील स्थापत्यशास्त्राची सार्यांना प्रचिती देते. मंदिराच्या पाठीमागून वाहणाऱ्या मृडानी नदीवर उंचावरून पांढऱ्याशुभ्र धारांनी संततधारा खाली कोसळणारा धबधबा या मंदिराच्या परिसराचे निसर्गसौंदर्य अधिक खुलवून टाकतो. मृडानी नदीकाठावरील श्री दत्तमंदिरही सर्व दत्तभक्तांचे श्रद्धास्थान असून, या मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम साऱ्यांचे लक्ष वेधून घेते.
चौकट
प्राचीन मंदिराचे जतन-संवर्धनासह सुशोभीकरण
प्राचीन मंदिरांच्या जतन-संवर्धन आणि परिसर विकास कार्यक्रम राज्यशासनातर्फे या मंदिराचे जतन अन् संवर्धन करताना सुशोभीकरण केले आहे. धूतपापेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले असून, त्यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्याला शासनाकडूनही निधी उपलब्ध करून देण्यात आला. या आराखड्याप्रमाणे मंदिराचा जीर्णोद्धार वा पुनर्बांधकाम करणे, मंदिर परिसरातील पर्यटनाच्या भाविकांच्यादृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे व इतर सोयीसुविधा संलग्न कामे करणे अशा तीन टप्प्यामध्ये जतन अन् संवर्धनाच्या कामांसह परिसर सुशोभीकरण सुरू आहे.
-------------
भाविकांसह पर्यटकांचा ओढा वाढला
मंदिर जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मंदिराचे आकर्षक अन् वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वार, प्रशस्त सभामंडप, तेथील लाकडी बांधकामासह लाकडी खांबावर करण्यात आलेले नक्षीदार कोरीव काम, मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, भाविकांसाठी बैठक व्यवस्था या ठिकाणी येणारे भाविकांसह पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. दत्तमंदिराकडे जाण्यासाठी मृडानी नदीवर बांधण्यात आलेल्या पूल आणि त्याची केलेली रंगरंगोटी लक्ष वेधून घेत आहे.
---------------
रस्ता रूंदीकरणाची गरज
राजापूर शहरातून श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणार्या मार्गावरून चापडेवाडी ते मंदिराकडे जाताना गणपती मंदिरापर्यंत रस्त्याचे रूंदीकरण अत्यंत आवश्यक आहे. भक्तगणांना तसेच पर्यटकांना व त्यांच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी, सद्यःस्थितीत असलेला अरूंद रस्ता खूप त्रासदायक होत असून, दोन वाहने समोरासमोरून आल्यानंतर कसरतीने चालवावी लागत आहे. महाशिवरात्र यात्रेवेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून, या काळामध्ये या अरूंद रस्त्यामुळे भाविकांना निशान घाटी, शाळेजवळ वाहने लावून सुमारे एक किलोमीटरची पायपीट करून मंदिराकडे जावे लागत आहे. रिक्षाचालक, मोटार सायकल चालक किंवा चारचाकी वाहने यांना अतिशय त्रासदायक होत आहे. अरूंद रस्त्यामुळे सहाचाकी वाहन एसटी किंवा आरामबस येत नसल्यामुळे पर्यटकांचीसुद्धा गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रिटीकरण व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टीने रस्त्याच्या एका बाजूला संरक्षक भिंती व कठड्यांची उभारणी करणे, अशी मागणी कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने नवीन पद्धतीच्या स्ट्रीटलाईट आणि शोभेची झाडे लावल्यास या परिसराच्या सौंदर्यात भर पडून पर्यटनालाही अधिक चालना मिळेल याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
-----------
कोट
धूतपापेश्वर देवस्थानाकडे जाणारा रस्ता अरूंद असल्याने भाविकांसह पर्यटकांना त्या ठिकाणी जा-ये करताना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रूंदीकरणासह काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण करावे. त्याचवेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने नवीन पद्धतीच्या स्ट्रीटलाईट आणि शोभेची झाडे लावल्यास या परिसराच्या सौंदर्यात भर पडून पर्यटनालाही अधिक चालना मिळेल. या विकासकामांबाबतची मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्याकडे केली आहे.
- अरविंद लांजेकर, माजी उपसरपंच, कोंढेतड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

