गाडगेबाबा भवनासाठी योगदान द्या

गाडगेबाबा भवनासाठी योगदान द्या

Published on

13769

गाडगेबाबा भवनासाठी योगदान द्या

दिलीप भालेकर ः सावंतवाडीत परीट समाजातर्फे अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः संत गाडगेबाबा यांच्या नावाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री संत गाडगेबाबा भवन बांधण्याचा मानस आहे. सर्व परीट समाजबांधवांनी एकजुटीने या भवनासाठी सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी संत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी गुरुवारी (ता. २५) उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी एसटी बसस्थानक, काझी शहाबुद्दीन हॉल व प्रांत कार्यालयाच्या परिसरात साफसफाई करण्यात आली. सुनील वाडकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली परीट समाजाची बैठक घेण्यात आली.
व्यासपीठावर सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजू भालेकर, उपाध्यक्ष स्वप्नील कदम, भगवान वाडकर, सचिव लक्ष्मण बांदेकर, सहसचिव सुरेंद्र कासकर, खजिनदार जितेंद्र मोरजकर, सहखजिनदार किरण वाडकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष महेंद्र आरोलकर, महिला जिल्हाध्यक्ष दीपाली भालेकर, जिल्हा खजिनदार संदीप बांदेकर, युनियनचे अध्यक्ष प्रदीप भालेकर, महिला तालुकाध्यक्ष देवयानी मडवळ, जिल्हा सदस्य संजय होडावडेकर, रितेश चव्हाण, शहर अध्यक्ष दयानंद रेडकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमानिमित्त ललिन तेली यांचे श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनपटावर सुश्राव्य असे कीर्तन सादर करण्यात आले. यावेळी सावंतवाडी मुख्याधिकारी संतोष जिरगे, प्रशासक अधिकारी श्री. अंधारे, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्व भक्त मंडळींना तीर्थप्रसाद व महाप्रसाद देण्यात आला. दुपारी महिला भगिनींचा हळदीकुंकू कार्यक्रम, भजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील परीट समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत तालुकाध्यक्ष राजू भालेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार शहराध्यक्ष दयानंद रेडकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com