जिल्हास्तरीय वक्तृत्व, कथाकथन स्पर्धा उत्साहात
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ
जिल्हास्तरीय वक्तृत्व, कथाकथन स्पर्धा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व निबंध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्पर्धाप्रमुख व संस्था सहसचिव किशोर नारकर यांनी स्पर्धा आयोजनाचा उद्देश सांगितला. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक सक्रे, सचिव रामचंद्र वरेकर, खजिनदार राजेंद्र लब्दे, संस्था सदस्य सिद्धार्थ जाधव, राजेंद्र रेडीज आदी उपस्थित होते. मंगळवारी (ता. ३०) कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे.
स्पर्धेचे निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ या क्रमाने) असा ः कथाकथन स्पर्धा गट क्र. १ (पाचवी ते सातवी)- ओम यादव (वाटूळ हायस्कूल), आरोही फडतरे (ओणी हायस्कूल), संयुक्ता मोरे (मिळंद हायस्कूल), ईश्वरी चव्हाण (पाचल हायस्कूल). गट क्र. २ (आठवी ते दहावी)- आर्या यादव (जवाहर नवोदय विद्यालय पडवे), पूर्वा आठल्ये (कोंडगाव साखरपा हायस्कूल), निलम धावलकर (पाचल हायस्कूल), कल्याणी पवार (पाचल हायस्कूल). गट क्र.३ (अकरावी ते पंधरावी) वैदेही गांगण (पाचल हायस्कूल), अनुश्री शेलार (रिंगणे हायस्कूल), सानिया यादव (लांजा कॉलेज), रिद्धी सोडये (कोंडये कॉलेज). निबंध स्पर्धा ः गट क्र. १ (पाचवी ते सातवी) आर्ष सांडम (पाचल हायस्कूल), भूमी बंडबे ( इंग्लिश मीडियम स्कूल पाली), ऋतुजा पाटेकर (जि. प. शाळा कोळंब). गट क्र. २ (आठवी ते दहावी) भक्ती सागवेकर (कोंड्ये हायस्कूल), सफा कालसेकर (पाचल हायस्कूल), गीतांजली पांचाळ (गोठणे दोनिवडे हायस्कूल). गट क्र. ३ (अकरावी ते पंधरावी) आकांक्षा चौगुले (ओणी हायस्कूल), काजल ऐनारकर ( कोंडये हायस्कूल), वैष्णवी चव्हाण (राजापूर हायस्कूल). वक्तृत्व स्पर्धा ः गट क्र.१ (पाचवी ते सातवी) आरोही फडतरे (ओणी हायस्कूल), सना कारेकर (आडिवरे हायस्कूल), सृष्टी कांबळे (मिळंद हायस्कूल), स्वरा सुतार (जि. प. शाळा पाचल). गट क्र. २ (आठवी ते दहावी) ऋतुजा मिरजोळकर (वडवली हायस्कूल), तपस्या बोरकर (फाटक हायस्कूल रत्नागिरी), जस्लीन हाजू (खरवते हायस्कूल), प्रतीक्षा बोडेकर (पाचल हायस्कूल). गट क्र. ३ (अकरावी ते पंधरावी) सानिया यादव (महाविद्यालय लांजा), अनुश्री शेलार (सरस्वती विद्यामंदिर रिंगणे), ओंकार आठवले (गोगटे -जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी), श्रुती कलमष्टे (मनोहर हरी खापणे कला, वाणिज्य महाविद्यालय पाचल).

