सरकारी कर्मचारी पतसंस्थेतर्फे
अॅड. निरवडेकर यांचा सत्कार

सरकारी कर्मचारी पतसंस्थेतर्फे अॅड. निरवडेकर यांचा सत्कार

Published on

13816

सरकारी कर्मचारी पतसंस्थेतर्फे
अॅड. निरवडेकर यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः ‘ॲड. अनिल निरवडेकर यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून सर्वाधिक मताधिक्याने त्यांना जनतेने विजयी केले. हा विजय म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव आहे. नगरसेवक पदाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यामुळे त्यांनी सामाजिक कार्यात झोकून घेणे गरजेचे आहे. आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत,’ असे गौरवोद्‌गार सिंधुदुर्ग राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष संजय आठल्ये यांनी काढले.
नवनिर्वाचित नगरसेवक ॲड. निरवडेकर यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे आजी-माजी संचालक व निरवडेकर मित्रमंडळाने सत्कार केला. यावेळी श्री. आठल्ये बोलत होते.
‘हा विजय माझा एकट्याचा नसून माझ्यासाठी कार्य केलेल्या सर्व मित्रांचा व माझ्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्यामुळेच हे यश मी मिळू शकलो,’ अशी प्रतिक्रिया यावेळी ॲड. निरवडेकर यांनी दिली. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेचे प्रभारी अध्यक्ष दिनेश खवळे, संचालक प्रकाश आडणेकर, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तथा तज्ज्ञ संचालक राजा वाडीकर, माजी संचालक राजू तावडे, संतोष पेडणेकर, राजन ठाकूर, चेतन नेरुळकर, बाळ पालव, चेतन आरवरी, सूर्या पवार, दशरथ गावडे, राजन सातार्डेकर, महेश दस्तुरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com