वृक्ष संरक्षणासाठी
तळेरेत साफसफाई

वृक्ष संरक्षणासाठी तळेरेत साफसफाई

Published on

13970

वृक्ष संरक्षणासाठी
तळेरेत साफसफाई
तळेरे, ता. २८ ः सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण रक्षणाचा वारसा जपत तळेरे-रघुचीवाडी येथील ब्राह्मणदेव कला-क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी औदुंबरनगर ते शिडवणे रस्त्यालगत लावलेल्या झाडांचे वणव्यापासून संरक्षणासाठी आजूबाजूच्या गवताची साफसफाई करण्यात आली. गतवर्षीही असाच अनुकरणीय उपक्रम राबविण्यात आला होता.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक वनीकरण विभागामार्फत लावण्यात आलेल्या या रोपांभोवती वाढलेले सुके गवत काढून टाकत ‘फायर लाईन’ तयार करण्यात आली. उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांमुळे या वृक्षसंपदेचे नुकसान होऊ नये, हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश होता. या सामाजिक कार्यात मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ किरण तळेकर, प्रथमेश नरसाळे, संदेश तळेकर, सिद्धेश तळेकर, शुभम साटम, प्रसन्न तळेकर, आर्यन पांचाळ, शरद तळेकर व अनुप तळेकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. काही सदस्यांनी वस्तू रुपाने सहकार्य केले. वृक्षारोपण केवळ कागदावर न ठेवता, लावलेली रोपे जगवण्यासाठी मंडळाने घेतलेल्या या पुढाकाराचे परिसरात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com