कोकण
साडवली-समजपूर्वक वाचन स्पर्धेत सुयश
शिक्षक सतीश वाकसे यांचे
समजपूर्वक वाचन स्पर्धेत सुयश
साडवली, ता. २८ ः महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित शिक्षक–अधिकारी–पर्यवेक्षकांसाठीच्या समजपूर्वक वाचन स्पर्धेत देव धामापूर–सप्रेवाडी शाळेतील शिक्षक सतीश आनंदा वाकसे यांनी विभागीय स्तरावर चतुर्थ क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
देवधामापूर सप्रेवाडी तालुका संगमेश्वर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री वाकसे हे केवळ शिक्षक नसून एक संवेदनशील मार्गदर्शक, इतिहासाचे अभ्यासक आणि उत्कृष्ट वाचक आहेत. त्यांचा वाचनाचा व्यासंग अफाट असून विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमधून त्यांनी शिक्षकांना समजपूर्वक वाचन, अध्ययन-अध्यापन पद्धती व मूल्याधिष्ठित शिक्षणाबाबत प्रभावी मार्गदर्शन केले आहे.

