लांजा-प्रत्येक नगरसेवकाला पाच लाखांची विकासकामे
rat28p13.jpg
13981
लांजाः माजी आमदार राजन साळवी यांनी नगराध्यक्ष सावली कुरुप आणि नगरसेवकांचा सत्कार केला.
---------
प्रत्येक नगरसेवकाला पाच लाखांची विकासकामे
राजन साळवींची घोषणा ; लांजात नगराध्यक्ष, नगरसेवकांचा सत्कार
लांजा, ता. २८ ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचे काम आणि निधी देण्याचे कबूल केले होते. त्यानुसार मला पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आगामी काळात या निधीच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लागतील. तसेच प्रत्येक नगरसेवकाला ५ लाख रुपयांची विकासकामे आपण देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
माजी आमदार राजन साळवी यांच्या हस्ते लांजा नगरपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार संपर्क कार्यालयात करण्यात आला. नगरसेवक म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर जनसंपर्काच्या माध्यमातून पुढे जा.
वाटेत भेटणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांशी सौजन्याने वागा. त्यांची विचारपूस करा, असा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमात नगराध्यक्ष सावली कुरूप, नगरसेवक व गटनेता योगेश कावतकर, पंढरीनाथ मायशेट्ये, मनोहर बाईत, मिलिंद लांजेकर, निधी गुरव, नगरसेविका श्रद्धा तोडकरी, नीलिमा कनावजे, प्रांजल यादव, नगरसेवक रफिक नेवरेकर, प्रणाली तेली, सिद्धेश भुवड, साक्षी मानकर, वैभव जोईल या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

