पर्यटन केंद्राचे स्वच्छतागृह व्यापाऱ्यांसाठी खुले करा
13996
पर्यटन केंद्राचे स्वच्छतागृह
व्यापाऱ्यांसाठी खुले करा
श्रेयश मुंज ः नगराध्यक्षांना निवेदन
सावंतवाडी, ता. २८ ः येथील आठवडा बाजारात येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय लक्षात घेता बाजूच्या पर्यटन केंद्रात सुरू असलेले स्वच्छतागृह डागडुजी करून तात्काळ खुले करावे यासाठी पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यात नमूद आहे.
निवेनात म्हटले आहे, की ‘पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आठवडा बाजार येथील पर्णकुटी विश्रामगृहाच्या परिसरात हलवला. त्या ठिकाणी बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहराच्या एका बाजूला हा बाजार असल्यामुळे कोणालाही त्रास नाही. ही जमेची बाजू आहे. मात्र, त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहक व विशेषतः व्यापाऱ्यांना स्वच्छतागृह नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांची व महिलांची मोठी गैरसोय होते. त्या ठिकाणी स्वच्छतागृह नव्याने उभारण्याची मागणी होत आहे. मात्र, सद्यस्थितीत बाजाराला लागून असलेल्या नगरपालिकेच्या पर्यटन सुविधा केंद्रात असलेले स्वच्छतागृह बंद आहे. त्या स्वच्छतागृहाचे नूतनीकरण केल्यास त्याचा फायदा निश्चितच येथील लोकांना व व्यापारी व ग्राहकांना होईल. याबाबत नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी. पर्यटन केंद्रातील स्वच्छतागृह सुरू होईल आणि नव्याने स्वच्छतागृह बांधण्याचा खर्च होणार नाही.’

