रत्नागिरी- निओमोशनतर्फे दुचाकी दुरुस्ती शिबिर
rat29p2.jpg-
14149
रत्नागिरी : आर. एच. पी. फाउंडेशन आणि निओमोशनतर्फे आयोजित दुचाकी दुरूस्ती शिबिरात सहभागी दिव्यांग बंधू-भगिनी.
साईनगर येथे आर. एच. पी. फाउंडेशन,
निओमोशनतर्फे दुचाकी दुरूस्ती शिबिर
रत्नागिरी, ता. २९ : आर. एच. पी. फाउंडेशनच्या सहकार्याने आणि निओमोशन, चेन्नई यांच्यातर्फे कुवारबाव-साईनगर येथे एस. के. नाकाडे यांच्या निवासस्थानी निओमोशन दुचाकी दुरूस्ती शिबिर झाले.
निओमोशनमुळे दिव्यांगाना रोजगार मिळालाच; परंतु निओमोशनमध्ये काही बिघाड झाला तर दुरूस्तीसाठी मुंबईला जावे लागायचे. त्यासाठी हे शिबिर घेण्यात आले आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. शिबिराचा लाभ सलीक भाटकर, खुतबुद्दीन मुकादम, भरत लोहकरे, श्रावणी शिंदे, वर्षाराणी सावंत, भारती भायजे, मुस्कान नाकाडे, सादिक नाकाडे, सुबोध जाधव आदी निओमोशन दुचाकीधारकांनी लाभ घेतला.
गाडीची पूर्ण तपासणी करून सर्व्हिसिंग करून दिले. गाडीचे भाग खराब बदलून दिले. या कामासाठी निओमोशनचे तंत्रज्ञ ऋषिकेश धनरे आणि प्रदीपकुमार सरोज आले होते. निओमोशनमुळे दिव्यांगाना रोजगार मिळाला. दिव्यांग स्वतः च्या पायावर उभा राहिला, आत्मसान्मानाने जगू लागला. आता निओमोशन डोअर टू डोअर जाऊन सर्व्हिस देते त्यामुळे दिव्यांगाना खूप फायदा झाला आहे. या शिबिरासाठी चिपळूणचे अशोक भुस्कुटे, चालक हेमंत भोसले, रिक्षाचालक संदीप धुमाळी, कुवारबाव ग्रामपंचायत माजी सदस्य सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते.

