रत्नागिरी- कला शाखेने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद
rat29p1.jpg-
14145
रत्नागिरी : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद कला शाखेतील खेळाडूंना देताना मुन्नाशेठ सुर्वे. सोबत प्रा. महेश नाईक, प्रा. सुनील गोसावी, प्रा. विद्याधर केळकर, प्रा. मकरंद दामले आदी.
कला शाखेने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद
अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालय; पद्मिनी भितळे ठरली वेगवाव धावपटू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील छंदोत्सवाअंतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. कला शाखेतील विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये बाजी मारत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सर्वसाधारण उपविजेतेपद शास्त्र शाखेला, सांघिक विजेतेपद शास्त्र शाखेला व उपविजेतेपद कला शाखेला मिळाले. गोल्डन बॉयचा मान मानस मानावे आणि गोल्डन गर्लचा मान पद्मिनी भितळे हिने पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उद्योजक आणि ग्रामदैवत भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, संस्थेच्या आजीव मंडळाचे अध्यक्ष प्रा. महेश नाईक, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, छंदोत्सव प्रमुख प्रा. मकरंद दामले, कला शाखाप्रमुख प्रा. वैभव कानेटकर, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. दिलीप शिंगाडे, क्रीडा शिक्षक लीना घाडीगावकर, राकेश मालप उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे विजेत्यांची नावे अशी- वैयक्तिक स्पर्धा- पद्मिनी भितळे (१००, २००, ४०० मीटर धावणे प्रथम, लांब उडी प्रथम, ८०० व १५०० मी. द्वितीय, गोळाफेक तृतीय), सिमरन पवार (८००, १५०० मी. धावणे प्रथम, २०० व ४०० मी. धावणे द्वितीय, १०० मी. तृतीय), रिया गावडे (गोळाफेक प्रथम, लांब उडी द्वितीय, १०० मी. धावणे द्वितीय, २०० व ४०० मी. धावणे तृतीय), मानस मानावे (४००, ८००, १५००, २०० मी. धावणे तृतीय, १०० मी. धावणे तृतीय), तन्मेश कटनाक (१००, २०० मी. धावणे प्रथम, ४०० मी. धावणे द्वितीय), प्रवीण बुरूंगले (२००, ४००, ८०० व १५०० मी. धावणे तृतीय), साहिल खवळे (लांब उडी द्वितीय, १५०० व ८०० मी. धावणे द्वितीय), शंतनू मोहिते (लांब उडी प्रथम, गोळाफेक तृतीय), शुभम बाईंग (लांब उडी तृतीय), रूद्र वाडकर (१०० मी. धावणे तृतीय), सर्वेश पाडावे (गोळाफेक प्रथम), वंश पावसकर (गोळाफेक द्वितीय), सई खातू (लांब उडी तृतीय), आदिती देसाई (गोळाफेक द्वितीय), विजयी व उपविजयी या क्रमाने कॅरम-मुले-सर्वेश पाडावे, चिन्मय वाडकर, मुली सेजल जाधव, स्वरदा साठे. बुद्धिबळ-मुले-सर्वेश परूळेकर, शौनक आठल्ये. मुली स्वरदा साठे, निर्मिती सुर्वे. बॅडमिंटन-मुले-हर्ष गमरे, वेदांत गराटे. मुली श्रेया आगाशे, मुली रिद्धी शेट्टी.
चौकट
गुणवंतांचा विशेष सत्कार
सचिन साळवी, देवेन साळवी, मृदुला पाटील, दिव्या पाल्ले, रिया मयेकर, योगेंद्र तायडे, श्रीया झोरे, आरोही पिलणकर, सायली कर्लेकर, राज पाडावे, अजय मीना, आदिती देसाई, सेजल जाधव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

