कुडाळ बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची
फुलपाखरांचे गाव पारपोलीला भेट

कुडाळ बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची फुलपाखरांचे गाव पारपोलीला भेट

Published on

14179

कुडाळ बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची
फुलपाखरांचे गाव पारपोलीला भेट
कुडाळ ः येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुलपाखरांचे गाव पारपोली येथे उपक्रमांतर्गत भेट दिली. या भेटीदरम्यान पाचवी, सहावी, सातवी, आठवी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी विविध रंगांची फुलपाखरे, वाघाच्या पायाचे ठसे, ट्री हाऊस व नदीचाही आनंद घेतला. राजेश कविटकर यांनी १८० फुलपाखरांच्या प्रजातींची माहिती दिली. तसेच फुलपाखरांचे जीवनचक्र सांगितले. फुलपाखरांचे पर्यावरणातील महत्त्व आणि संरक्षण याबाबतही माहिती देण्यात आली. या उपक्रमासाठी मार्गदर्शन करणारे संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, सेंट्रल स्कूलच्या प्रा. चैताली बांदेकर, शाळेचे शिक्षक, वैभवी नाईक, प्राजक्ता जाधव, पौर्णिमा शिरवलकर, साईश गणाचारी, मिलिंद धोंड, चेतन गवळी यांचेही विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य लाभले.
........................
14178

कवठीत १० जानेवारीला ‘डबलबारी’
कुडाळ ः रणझुंजार मित्रमंडळ, संजय करलकर मित्रमंडळ व कवठी ग्रामस्थ तसेच उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत आमने-सामने डबलबारी भजनांचा जंगी सामना १० जानेवारीला सायंकाळी सातला कवठी सातेरी मंदिर मैदान येथे आयोजित केला आहे. या डबलबारीसाठी बुवा संदीप पुजारे (श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नाडण-देवगड, गुरुवर्य जयराम घाडीगांवकर यांचे शिष्य) व विरुद्ध श्रीकांत शिरसाट (ओम चैतन्य गगनगिरी प्रासादिक भजन मंडळ उंबर्डे, ता. वैभववाडी, गुरुवर्य (कै.) चंद्रकांत कदम यांचे शिष्य यांच्यात हा सामना रंगणार आहे. बुवा पुजारे यांना पखवाज साथ संकेत राऊत, तबला साथ कौस्तुभ घाडी, शिरसाट यांना पखवाज साथ अमोल पांचाळ व तबला साथ विनायक रांबाडे करणार आहेत. रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय करलकर मित्रमंडळ, रणझुंजार मित्रमंडळ, श्री. पावसकर व कवठी ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com