रत्नागिरी- विजेत्यांचा कोतवडे प्रशालेत सन्मान
rat29p9.jpg-
14156
रत्नागिरी : कोतवडे हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरणावेळी तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष स्वप्नील मयेकर यांचा सत्कार करताना कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे (मुंबई) अध्यक्ष गजानन पेडणेकर. सोबत सतीश शेवडे, संजय मयेकर, संजय कोलगे आदी.
चित्रकला, रांगोळी व विज्ञान प्रदर्शनातील
विजेत्यांचा कोतवडे प्रशालेत सन्मान
रत्नागिरी, ता. २९ : तालुक्यातील कोतवडे येथील विजयसिंहराजे पटवर्धन इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात झाले. विविध विभागाच्यावतीने संस्कृत प्रदर्शन, चित्रकला, रांगोळी व विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे (मुंबई) अध्यक्ष गजानन पेडणेकर, प्रमुख पाहुणे सतीश शेवडे, संस्थेचे उपाध्यक्ष संजय मयेकर, कार्यवाह संजय कोलगे, सहसचिव राजेंद्र फणसोपकर, खजिनदार सत्यवान तळेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, मुख्याध्यापक प्रेमदास पवार आदी प्रमुख उपस्थित होते. ज्या देणगीदारांनी ठेवी ठेवलेले आहेत त्यांच्या व्याजातून व काही देणगीदारांनी रोख रकमा देऊन विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली. दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला. प्रमुख पाहुणे सतीश शेवडे यांनी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या वेळी व्यासपिठावर प्रकाश ठोंबरे, अनंत पालये, राजेंद्र कोसले, अविनाश रामाणे, शंकर कोळंबेकर, रोशन कांबळे, सरपंच संतोष बारगोडे, डॉ. कुलकर्णी, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गुरूदास खुळे यांनी केले. संमेलनासाठी यश लिंगायत, अमित लोखंडे यांनी सहकार्य केले.
चौकट
विशेष सत्कार
तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष स्वप्नील मयेकर आणि रत्नागिरी पोलिस भरतीत निवड झालेल्या माजी विद्यार्थिनी आदिती चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. गावातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच मुन्नाभाई कोतवडेकर यांनी आईच्या स्मरणार्थ सव्वा लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. दिगंबर तथा बापू जोशी यांच्यावतीने दिला जाणारा श्री स्वामी समर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार कलाशिक्षक बागुल यांना देण्यात आला.

