रत्नागिरी- पानिपतकार विश्वास पाटील यांची सुखद भेट

रत्नागिरी- पानिपतकार विश्वास पाटील यांची सुखद भेट

Published on

rat29p19.jpg-
14181
सातारा : साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याशी संवाद साधताना रत्नागिरीतील अॅड. विलास पाटणे.

पानिपतकार विश्वास पाटील यांची सुखद भेट
रत्नागिरी, ता. २९ : सातारा येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कादंबरीकार विश्वास पाटील यांची आज सातारा येथे रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष, लेखक अॅड. विलास पाटणे यांनी सदिच्छा भेट घेतली.
या संबंधी पाटणे यांनी सांगितले, माझ्या अक्षरप्रकाश या पहिल्या पुस्तक प्रकाशनाला माझे मित्र विश्वास पाटील हजर होते. त्यांची दोनवेळा मी मुलाखत घेतली होती. सातारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांची भेट झाली नव्हती. आज सकाळी त्यांची भेट घेतली. त्यांच्या पानिपत आणि झाडाझडती या दोन महत्त्वाच्या कालाकृतींनी त्यांना मराठी वाचकांमध्ये सर्वदूर पोचवले. अलीकडेच पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नोव्हेंबर २०१९ मध्ये पासीघाट (अरूणाचल प्रदेश) येथे झालेल्या २३ भारतीय भाषांच्या बहुभाषिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांना भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार यासह सत्तरहून अधिक साहित्य पुरस्कार गेल्या तीन दशकांत मिळाले आहेत. साताऱ्यातील स्व. यशवंतराव चव्हाण आदी प्रभूतींना अभिवादन करून पाटील संमेलनस्थळी पोहोचणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधला आणि साहित्यिक गप्पा रंगल्या, असे अॅड. पाटणे यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com