संगमेश्वर-कोकणवासीयांचा संयम संपला
rat29p4.jpg-
14151
संगमेश्वर ः मुंबई–गोवा महामार्गावर झालेली वाहतूककोंडी.
rat29p5.jpg-
14152
महामार्गावर होत असलेला धुळीचा त्रास.
----------
मुंबई–गोवा महामार्गाविरोधात संगमेश्वरात एल्गार
संगमेश्वर टप्प्यात काम रखडले; वाहतूककोंडीसह धुळीचा त्रास
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २९ ः मुंबई–गोवा महामार्गाचे काम सुमारे १७ वर्षांपासून रखडलेले आहे. सरकार, प्रशासन आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे कोकणवासियांचा संयम अखेर तुटलेला आहे. अपघात, वाहतूककोंडी, धुळीचे साम्राज्य आणि प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळाविरोधात आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या जनभावनेचा स्फोट म्हणून ‘मुंबई–गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’ आणि कोकणवासियांच्यावतीने ११ जानेवारी रोजी संगमेश्वर येथे ‘रास्तारोको’ करण्यात येणार आहे.
कोकणच्या विकासाचा कणा असलेला मुंबई-गोवा महामार्ग केवळ आश्वासनांचा ढिगारा ठरला असून, रोजच्या अपघातांत निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. तरीही सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडत नसल्याचा आरोप जनआक्रोश समितीतर्फे करण्यात येत आहे. या अन्यायाविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि रखडलेल्या कामाचा जाब विचारण्यासाठी ११ रोजी सकाळी १० वा. संगमेश्वर बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. आता केवळ निवेदनांवर विश्वास नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका जनआक्रोश समितीने मांडली आहे. या आंदोलनात कोकणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने तातडीने काम पूर्ण करण्याची ठोस हमी न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कोट
महामार्गावर संगमेश्वर ते बावनदी या टप्प्यात ३ ठिकाणी वाहने चालवणे म्हणजे त्रासदायक आहे. या भागात वाहनांना जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे खेड ते संगमेश्वर-धामणीपर्यंत वाहने वेगाने येतात; मात्र पुढे वेग कमी होतो आणि पर्यटकांचा प्रवास कंटाळवाणा होतो. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे.
- प्रशांत कवळे, वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

