रत्नागिरी- हिंदूंवरील अत्याचाराविरोधात धरणे आंदोलन
rat29p22.jpg-
14199
रत्नागिरी : बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सोमवारी संविधान सन्मान मंचातर्फे निदर्शने करताना हिंदू समाजाचे कार्यकर्ते.
--------------
हिंदूंवरील अत्याचाराविरोधात धरणे आंदोलन
संविधान सन्मान मंच; त्वरित कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार, हत्या, जबरदस्ती धर्मांतर व धार्मिक स्थळांची तोडफोड यांचा तीव्र निषेध करत संविधान सन्मान मंचाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. रत्नागिरीतील बांगलादेशी रहिवासी व रोहिंग्या मुसलमान आढळले असून, त्यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना बांगलादेशात पाठवून द्या, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली अन्यथा संविधानिक मार्गाने हिंदू समाज आंदोलन करेल, असा इशारा आज देण्यात आला.
हिंदू समाज सक्षमपणे व संघटितपणे एकत्र उभा आहे. कट्टरपंथीय लोक सुसंस्कृत रत्नागिरीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. रत्नागिरीतील बांगलादेशींना हटवले नाहीत तर हिंदू समाज संविधानिक मार्गाने जे जे करता येईल ते करणार आहे. रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आढळत आहेत. अनेक प्रकारचे जिहाद होत आहेत, धर्मांतर होत आहे. हे आपण सहन करणार आहोत का0 सनातन हिंदू समाज एकत्र आणि सक्षम आहे. जिहाद होत असतील तर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी आळा घालावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
रत्नागिरीच्या एका भागात जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानंतर हिंदू धर्मियांना अडकवण्याचा प्रयत्न केला; परंतु जिहादी व्यक्तीने घोषणा देऊन हिंदूला अडकवले. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला ताब्यात घेतले. असे प्रकार घडू नयेत, असा इशारा दिला. या प्रसंगी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतुकीला अडथळा होऊ नये याकरिता खबरदारी घेण्यात येत होती. आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्याकरिता देण्यात आले.
चौकट १
देशाच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करावा
भारत सरकारने बांगलादेश सरकारवर कडक भूमिका घ्यावी, आर्थिक व अन्य मदत थांबवावी तसेच तेथील हिंदू बांधवांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांची सखोल चौकशी करून त्यांना देशाबाहेर हाकलण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

