वीज कंत्राटी कामगार संघ जिल्हा अध्यक्षपदी बांदेकर
14233
वीज कंत्राटी कामगार संघ
जिल्हा अध्यक्षपदी बांदेकर
बांदा ः महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने येथील संदीप बांदेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघाचे राज्याध्यक्ष नीलेश खरात यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र दिले. कामगारांचे हित जपणारे निर्णय घेऊन संघटनात्मक कार्य अधिक बळकट करावे व सर्व कामगार मित्रांना सोबत घेऊन संघ मजबूत करावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली. संघाच्या पदाधिकाऱ्यांसह कामगार वर्गातून बांदेकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील संघटनेने टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवून कष्टकरी, वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथे झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा नूतन कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली. केंद्रीय कार्यकारिणीवर आनंद लाड, जिल्हा उपाध्यक्षपदी मोहन गावडे, दिनेश तांबे, जिल्हा सरचिटणीसपदी संजय गोवेकर, जिल्हा कोषाध्यक्षपदी महेश राऊळ यांची निवड जाहीर करण्यात आली. बैठकीस संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नीलेश खरात, सचिन मेंगाळे, राहुल बोडके, सागर पवार, अमर लोहार, उमेश आनेराव आदी उपस्थित होते.

