मंडणगड- दहागाव विज्ञान प्रदर्शनात आदित्य कदम प्रथम
rat29p17.jpg-
14164
दहागाव : विज्ञान प्रदर्शनात यश मिळवलेले विद्यार्थी.
----------
दहागाव विज्ञान प्रदर्शनात आदित्य कदम प्रथम
एलबीएसएच विद्यार्थीमंचाचा उपक्रम; २३ विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २९ः तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूल माजी विद्यार्थीमंचतर्फे दहाव्या वर्धापनदिनानिमित्त प्रशालेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात मंडणगड तालुक्यातील एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये आदित्य कदम याने प्रथम क्रमांक पटकावला.
प्रदर्शनाचे उद्घाटन गटविकास अधिकारी सुनील खरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची ‘अग्निपंख’ व ‘एक होता कार्व्हर’ ही पुस्तके वाचावीत, असे आवाहन केले तसेच गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे यांनी प्रदर्शनास सदिच्छा भेट दिली. ॲड. अभिजित गांधी यांनी माजी विद्यार्थीमंचामार्फत विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे नमूद केले. प्रस्तावना मंचाचे सचिव महेंद्र सावंत यांनी केली. सूत्रसंचालन सहसचिव समीर खोचरे यांनी केले. विज्ञान प्रदर्शनांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत आदित्य कदम (लाटवण पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, लाटवण) याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला ५ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मोहम्मद सैफ मुंडे (उर्दू हायस्कूल, म्हाप्रळ) याने द्वितीय क्रमांक मिळवून ३ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र प्राप्त केले. अर्णव सुतार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड) याने तृतीय क्रमांक मिळवून २ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र मिळवले.
स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ५०० रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडणगड तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सोनावणे, सल्लागार शांताराम बैकर तसेच सहभागी शाळांतील विज्ञान, गणित व प्राथमिक शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले. माजी विद्यार्थीमंचाचे अध्यक्ष दीपक गोरिवले, सचिव महेंद्र सावंत, खजिनदार नंदकुमार दळवी, सहसचिव समीर खोचरे, उपाध्यक्ष संदीप सुखदरे तसेच सुभाष दळवी, नरेश चव्हाण, सूर्यकांत खेराडे, ज्योती साळवी, नंदिनी पाटणकर, परीक्षक प्रसाद पावशे, शिंदे (पालगड) यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

