गुहागर-खातू मसाले उद्योगाचा 49 वा वर्धापनदिन उत्साहात

गुहागर-खातू मसाले उद्योगाचा 49 वा वर्धापनदिन उत्साहात

Published on

rat29p24.jpg-
O14201
गुहागर ः खातू मसाले उद्योगाच्या वर्धापनदिनानिमित्त उत्कृष्ट सेल्समन म्हणून अमित गोताड यांना गौरवण्यात आले.
-----------------
खातू मसाले उद्योगाचा
४९ वा वर्धापनदिन उत्साहात
गुहागर, ता. ३० : पर्यटकांसह कोकणवासियांचे जिभेचे चोचले पुरवणाऱ्या कोकणातील गुहागरचे सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योगाचा 49वा वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी उद्योगाच्या यशस्वीतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पारितोषके देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खातू मसालेचे मुंबई कार्यालयाचे प्रतिनिधी यशस्वी उद्योजक गिरीश काशीनाथ कोळवणकर व कॅडबरी कंपनीतील निवृत अधिकारी सुरेश अनंत देवळेकर, विजय जुवळी उपस्थित होते.
गुहागरसारख्या छोट्या गावामध्ये १९७६ ला शुन्यातून विश्व उभारत यशाची सर्वात उंच शिखरे गाठून खातू मसालेचे सर्वेसर्वा उद्योगभूषण डॉ. शाळिग्राम खातू यांनी खातू मसाले हा एकमेव ब्रँड निर्माण केला. खातू मसालेची उत्पादने मुंबईबरोबरच सातासमुद्रापार म्हणजेच इंग्लंड, दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी पोहोचली आहेत शिवाय देशातील विविध मॉल, डी मार्ट, अपना बाजार, बिगबाजार व ऑनलाईन मार्केटिंग करणाऱ्या अॅमेझॉनवरही उत्पादने उपलब्ध आहेत.
खातू मसाले उद्योगसमुहाच्या यशात आर्थिक सल्लागार बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक भास्करराव दत्ते, मुले शैलेंद्र आणि सूरज तसेच पूर्ण कुटुंबाची लाभलेली साथ आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेले प्रामाणिक काम यामुळेच आज खातू मसाले यशाच्या शिखरावर आहे. यानिमित्त यावर्षी खातू मसालेचे उत्कृष्ट सेल्समन म्हणून प्रथम अमित शंकर गोताड, द्वितीय गणेश सुरेश रहाटे, तृतीय संदीप शंकर रहाटे यांना गौरवण्यात आले तसेच हॉटेल अन्नपूर्णामधील सेवानिष्ठ कर्मचारी दणदणे बुवा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com