खारेपाटणमध्ये ''वन''कडून जखमी माकडाला जीवदान
14290
वनविभाग कर्मचाऱ्यांतर्फे
जखमी माकडाला जीवदान
तळेरे, ता. २९ : खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा क्र. १ येथील शालेय विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या रहदारी असणाऱ्या घाटी रस्त्यावर आज सकाळी एक मृत व एक जखमी अवस्थेतील माकड आढळून आला. त्यातील जखमी माकडाला जीवदान देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथील शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी तत्काळ वनविभागाला बोलावून घेतले. जखमी माकडाला वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत पिंजऱ्यांमध्ये सुरक्षित जेरबंद केले. मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांना दोन्ही माकडे आढळून आली. जखमी माकडाला पिंजऱ्यामध्ये सुरक्षित जेरबंद करून पुढील उपचारासाठी फोंडाघाट येथे नेण्यात आले. या टीममध्ये कणकवली वनविभाग बचाव कृती दलाचे कर्मचारी नीलेश मोरये, रिदेश तेली, मयुर राणे, विठ्ठल बिडये, खारेपाटण वनविभाग तपासणी वनरक्षक अविनाश राठोड यांचा सहभाग होता.

