शिंदे सेनेचा दणका, ठेकेदाराची नरमाई

शिंदे सेनेचा दणका, ठेकेदाराची नरमाई

Published on

14289

शिंदे सेनेचा दणका, ठेकेदाराची नरमाई

मालवणातील प्रश्‍न; कंत्राटींना वेतन देण्याची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २९ : येथील ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन दिले जात नसल्याने शिंदे शिवसेनेने याबाबत आज वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांचे मानधन देता येत नसेल तर ठेका का घेतला, त्यापेक्षा ठेकदार बदलावा, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. शिवसेनेच्या यशस्वी चर्चेनंतर अखेर ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे मानधन देण्याचे कबूल केले.
येथील ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने मानधन दिले जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. तिन्ही कामगारांच्या कुटुंबांची उपासमार होण्याची भीती निर्माण झाली आहे. यातील काही कामगार हे भाड्याच्या खोलीत राहत असल्याने त्यांना घरमालकांनी खोली रिकामी करण्याचीही सूचना केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना महिला शहरप्रमुख तथा नगरसेविका पूनम चव्हाण, नगरसेवक दीपक पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी नगरसेवक सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, मेघा सावंत, अश्विनी कांदळकर, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, विश्वास गावकर, शेखर गाड, किसन मांजरेकर, तेजस लुडबे, बाळू नाटेकर उपस्थित होते.
किमान वेतनानुसार कर्मचाऱ्यांना मानधन मिळायला हवे. कर्मचाऱ्यांचे मानधन देता येत नसेल तर ठेका का घेतला? कर्मचाऱ्यांची उपासमार होते हे दुर्दैवी आहे, अशी खंत पूनम चव्हाण व्यक्त केली. तसेच ठेकेदार बदलण्याची मागणी केली. ठेकेदाराला आज बोलावण्यात यावे, असे सांगितले असतानाही तो आला नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अखेर वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी ठेकेदारासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी पाटकर यांनी ठेकेदाराशी चर्चा करत कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव न करता सर्वांना सारखेच मानधन द्यावे. राहिलेल्या महिन्यांचे मानधन तत्काळ द्यावे, अशी सूचना केली. त्यावर ठेकेदाराने मानधन लवकरच जमा करणार असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com