कोतवडे हायस्कूलमध्ये नवीन रंगमंचाचे उद्घाटन
कोतवडे हायस्कूलमध्ये
नवीन रंगमंचाचे उद्घाटन
रत्नागिरी, ता. ३० : कोतवडे येथील विजयसिंहराजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये नवीन रंगमंचाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक यदुनाथ राजाराम तथा बापू बेर्डे (मुंबई) यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गजानन पेडणेकर, उपाध्यक्ष संजय मयेकर, कार्यवाह संजय कोलगे, सहकार्यवाह राजेंद्र फणसोपकर, खजिनदार सत्यवान तळेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, मुख्याध्यापक प्रेमदास पवार उपस्थित होते. या वेळी बेर्डे यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ या रंगमंचासाठी आवश्यक असलेला सर्व निधी उपलब्ध केला. मुलाची आठवण म्हणून कोतवडे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) यांच्या सहकार्याने या रंगमंचाची निर्मिती करण्यात आली. यापुढे हा रंगमंच दिवंगत अनुराज यदुनाथ बेर्डे या नावाने ओळखला जाणार आहे. आधुनिक युगामध्ये आवश्यक सर्व शैक्षणिक कौशल्य या शाळेमध्ये देण्यात यावीत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपन्न होण्याच्या सर्व गोष्टींचा संस्थेने अग्रक्रमाने विचार करावा, अशी सूचना बेर्डे यांनी केली. तसेच मुलाचे नाव अजरामर केल्याची भावना व्यक्त केली.

