रत्नागिरी- राधिका भिडे हिने जिंकली मने
rat30p2.jpg-
14350
रत्नागिरी : फाटक हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात आय पॉपस्टार राधिका भिडे हिचा सत्कार करताना अॅड. सुमिता भावे.
‘फाटक’च्या स्नेहसंमेलनात गायिका
राधिका भिडे हिने जिंकली मने
रत्नागिरी, ता. ३० : फाटक हायस्कूल व गांगण, केळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला विशेष अतिथी म्हणून आय पॉपस्टार गायिका, संगीतकार, फाटक हायस्कूलची माजी विद्यार्थिनी राधिका भिडे हिने साऱ्यांची मने जिंकली. तिला विशेष निमंत्रित केले होते.
या प्रसंगी राधिकाचा सत्कार दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे यांनी केला.
या प्रसंगी मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, संस्था पदाधिकारी, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी उपस्थित होते. राधिकाने सादर केलेल्या ‘मन धावतया आणि उजेड पडला छान गनोबा’ या लोकप्रिय गीताने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन केलेल्या सुंदर सादरीकरणाने वातावरण उत्साही झाले. लोकनृत्य स्पर्धेत नववी-दहावीच्या गटात नववी ‘ई’चे गोंधळ नृत्य, दहावी ‘अ’चे वारकरी नृत्य आणि नववी ''अ''चे शेतकरी नृत्य यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन दिनेश नाचणकर व शिल्परेखा जोशी यांनी केले.

