आराध्य फणसेला कांस्यपदक

आराध्य फणसेला कांस्यपदक

Published on

rat30p5.jpg-
14353
कुडाळ : राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आराध्य फणसेला कास्यपदक प्रदान करताना मान्यवर.

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत
आराध्य फणसेला कास्यपदक
रत्नागिरी, ता. ३० : सबज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आराध्य फणसे याने राज्य फाईट स्पर्धेत ३५ किलोखालील वजनीगटात कास्यपदक मिळवले. कुडाळ- उद्यमनगर येथे ही स्पर्धा झाली.
स्पर्धेत विविध जिल्ह्यांमधून ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला. युवा मार्शल आर्ट टायकोंडो ट्रेनिंग सेंटर, ओम साई मित्रमंडळ नाचणे- साळवी स्टॉप येथे प्रशिक्षण घेणारा व पटवर्धन हायस्कूलच्या आराध्यने स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेसाठी शशीरेखा कररा यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. आराध्यला प्रशिक्षक राम कररा, गुरूप्रसाद सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे आराध्यने यश मिळवल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com