रत्नागिरी- पटवर्धन हायस्कूलमध्ये कला, कार्यानुभव, रांगोळी प्रदर्शन

रत्नागिरी- पटवर्धन हायस्कूलमध्ये कला, कार्यानुभव, रांगोळी प्रदर्शन

Published on

at30p3.jpg-
14351
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये कला, कार्यानुभव, रांगोळी प्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना चित्रकार दिलीप भातडे. सोबत डावीकडून सुजय कांबळे, अनुजा कानिटकर, श्रीराम भावे, जानकी घाटविलकर, धनेश रायकर आदी.

पटवर्धन हायस्कूलमध्ये
कला, कार्यानुभव, रांगोळी प्रदर्शन
रत्नागिरी, ता. ३० : पटवर्धन हायस्कूलमध्ये चित्रकला, कार्यानुभव व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या कॅप्टन ठाकूर सभागृहात दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह, चित्रकार दिलीप भातडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कमर्शियल आर्टिस्ट व माजी विद्यार्थी सुजय कांबळे प्रमुख उपस्थित होते. प्रसिद्ध चित्रकार अनुजा कानिटकर यांनी व्यक्तिचित्र रेखाटनाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
उद्घाटन कार्यक्रमास भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर, पालक-शिक्षकसंघाचे अध्यक्ष सुनील कीर, पालक प्रतिनिधी चौगुले, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर उपस्थित होते. चित्रकला प्रदर्शनाच्या मांडणीचे नेतृत्व विभागप्रमुख मुग्धा पाध्ये व उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर यांनी केले. कार्यानुभवची मांडणी विभागप्रमुख पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. प्रदर्शनामध्ये पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली एकूण एक हजारपेक्षा अधिक चित्रे प्रदर्शित करण्यात आली. कार्यानुभव विभागाच्या २०० ते २५० विविध वस्तू आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे रांगोळी प्रदर्शनदेखील विशेष आकर्षण ठरले. रांगोळी प्रदर्शनाची जबाबदारी गांधी, शेट्ये व तेंडुलकर यांनी समर्थपणे पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com