स्काऊट-गाईड शिबिरात सेवेचे धडे
14395
स्काऊट-गाईड शिबिरात सेवेचे धडे
सावंतवाडीतील उपक्रम; भोसले स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कब-बुलबुल व स्काऊट्स गाईड शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात झाले. शिबिराची सुरुवात प्रार्थना गीत व ध्वज वंदनाने झाली. संस्थापक अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले. कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्या प्रियंका देसाई उपस्थित होत्या.
या कब-बुलबुल व स्काऊट-गाईड शिबिराच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी क्रियात्मक गाणी, हस्तकला, कचऱ्यापासून वस्तू तयार करणे, रांगोळी, सजावटीच्या वस्तू, ट्रेझर हंट तसेच फ्लेमलेस कुकिंग यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरांतर्गत सायंकाळी कॅम्पफायरचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कॅम्पफायरभोवती फेर धरत गाणी गात स्काऊट्स-गाईड्सवर आधारित नाट्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गाणी व नाट्यछटांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्यायाम, कॅम्पस स्वच्छता व सर्वधर्म प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर तंबू सजावट, तात्पुरते तंबू उभारणी, कॅम्पक्राफ्ट, गाठी बांधणे, शिट्टीचा उपयोग व चिन्हांची ओळख यांसारखे उपक्रम राबवण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धांचे निकाल जाहीर करून यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या शिबिरातून विद्यार्थ्यांनी शिस्त, जीवन कौशल्ये, सेवा वृत्ती व सहकार्याचे महत्त्व आत्मसात केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

