श्रमदानातून माखजनमध्ये रस्त्यांची स्वच्छता
वेद गुरवला
रौप्य पदक
रत्नागिरी ः तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित सबज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्रातील ६०० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर, साळवी स्टॉप येथे प्रशिक्षण घेणारा आणि ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण घेत असलेला वेद गुरवने रौप्यपदक पटकावले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शशीरेखा कररा यांनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच वेदला प्रशिक्षक राम कररा यांचे मार्गदर्शन लाभले. वेदच्या यशामागे आई-वडिलांचा प्रोत्साहनाचा मोठा वाटा असल्याचे मत प्रशिक्षकांनी व्यक्त केले.
-------
श्रमदानातून माखजनमध्ये
रस्त्यांची स्वच्छता
संगमेश्वर ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने माखजन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील रस्त्यांची कामे तसेच रस्त्यांची व पाणंद रस्त्यांची दुरूस्ती व स्वच्छता करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यामध्ये गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गावातील स्वच्छता राखणे, रस्ते सुस्थितीत ठेवणे आणि दळणवळण सुलभ होण्यासाठी महिलांनी एकत्र येत श्रमदानातून रस्त्यांची साफसफाई केली. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हे कार्य अत्यंत प्रभावीपणे पार पडले. या वेळी सरपंच महेश बाष्टे, सदस्या वैष्णवी चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत रणखांब, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत माखजन कार्यक्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.
-------
क्रिकेट स्पर्धेत
देवडे बॉईज विजयी
साखरपा ः संगमेश्वर तालुक्यातील श्री गोपाळकृष्ण युवा मित्रमंडळ मुर्शी, वाणीवाडी येथे घेण्यात आलेल्या ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत देवडे बॉईज संघ विजेता व गांगेश्वर कनकाडी संघ उपविजेता ठरला. तसेच राहुल ११ संघाला तृतीय पारितोषिकावर समाधान मानावे लागले. उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज म्हणून देवडे बॉईज संघाच्या अमोल कांगणेची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक १० हजार रुपये, तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये व तिन्ही विजेत्यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत सचिन निवळकर, चिन्मय भिंगार्डे, प्रमोद मोघे, नीलेश मोघे, श्रेयश शेट्ये व सुरज शेट्ये यांनी पंच म्हणून काम पाहिले.
------
सहा जानेवारीपासून
बालमहोत्सव
रत्नागिरी ः बालकांसाठी ६ ते ८ जानेवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारूती मंदिर येथे बालमहोत्सव आयोजित केला आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. जिल्ह्यातील बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय व स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ निराधार उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बालमहोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवात संस्थाबाह्य (नगरपालिका शाळांमधील) मुलेही सहभागी होणार आहेत. या महोत्सवात क्रिकेट, खो-खो, कबड्डी, गोळाफेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, ४ बाय १०० मीटर रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर वक्तृत्व अशा क्रीडा स्पर्धा तसेच सामूहिक नृत्य, सामूहिक गायन, नाटिका, वैयक्तिक नृत्य, गायन इ. सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

