कुडाळ रोटरी क्लबने सेवाभाव जपला

कुडाळ रोटरी क्लबने सेवाभाव जपला

Published on

14465

कुडाळ रोटरी क्लबने सेवाभाव जपला

जिल्हाधिकारी धोडमिसे ः फॅन्सी ड्रेस, नृत्य, गायनाने महोत्सवात रंगत

कुडाळ, ता. ३० ः नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याचा रोटरी क्लब कुडाळचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी रोटरी महोत्सव उद्‍घाटनप्रसंगी केले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नृत्य व गायनाने हा महोत्सव यादगार ठरला.
हवेत फुगे उडवून महोत्सवाचे उद्‍घाटन झाले. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार सचिन पाटील, पीडीजी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० संग्राम पाटील, संगीतकार विजय गवंडे, असिस्टंट गव्हर्नर डॉ. प्रशांत कोलते, कुडाळ रोटरी क्लबचे अध्यक्ष राजीव पवार, सचिव मकरंद नाईक, रोटरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. राजीव बिले, सचिन मदने, गजानन कांदळगावकर, डॉ. संजय केसरे, डॉ. संजय सावंत उपस्थित होते.
अॅड. पाटील म्हणाले, ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे चार जिल्हे व गोवा आणि कर्नाटकातले जिल्हे मिळून आज १५० क्लब कार्यरत आहेत. चार क्लब असे महोत्सव घेतात, त्यामध्ये कुडाळ रोटरी क्लबचा समावेश आहे.’
दरम्यान, विविध नृत्याविष्कार आणि मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि गायनाच्या कार्यक्रमामुळे हा सोहळा यादगार ठरला.
....................
आज ‘धुमधडाका’
रोटरी महोत्सवात उद्या (ता. ३१) अफलातून मनोरंजनाचा ‘धुमधडाका’ कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सुपरस्टार संतोष जुवेकर, तू आभाळ फेम पार्श्वगायक रवींद्र खोमने, सुप्रसिद्ध गायिका अमिता घुगरी, ‘कोकणचा महागायक’ सागर कुडाळकर, नृत्यांगना नुपूर जोशी, निवेदक किरण खोत असतील. लकी ड्रॉ सोडतमध्ये विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. बांदा येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुप तसेच स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार यांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com