नवोपक्रम स्पर्धेत राजेश गोसावींची राज्यस्तरावर भरारी
rat31p2.jpg
राजेश गोसावी
----------
नवोपक्रम स्पर्धेत राजेश गोसावीची भरारी
जिल्ह्यात प्रथम क्रमांक ; अनुभव नाट्यतंत्रांचा विषयावर सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ः महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित नवोपक्रम स्पर्धेमध्ये पीएमश्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा झरेवाडी या शाळेतील अभ्यासू, गुणवंत, प्रयोगशील, उपक्रमशील पदवीधर शिक्षक राजेश गोसावी यांच्या ‘अनुभव नाट्यतंत्रांचा’ या नवोपक्रमास जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला असून या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
शासनाच्या २०२० शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये विविध व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा या दृष्टीने नाट्य या विषयातील विविध तंत्रांचा प्रत्यक्ष अनुभव विविध कार्यशाळा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. यामध्ये नाट्य अभिनय कार्यशाळा, प्रकाश योजना कार्यशाळा, पार्श्वसंगीत कार्यशाळा, नेपथ्य कार्यशाळा, नाट्यअनुभव, वेशभूषा रंगभूषा कार्यशाळा, गायन कार्यशाळा, नृत्य कार्यशाळा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, किल्ले बांधणी स्पर्धा, बोधकथा पाठांतर स्पर्धा, स्वागत सादरीकरण, क्लासरूम प्रोडक्शन, गणपती कारखाना भेट, मातीकाम, वारकरी दिंडी, आकाशवाणी रत्नागिरी येथे कार्यक्रम, वाचन संकल्प, कोकणातील लोककलांची ओळख यासारख्या उपक्रमांचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला. या सर्वच उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी निश्चितपणे उपयोग झाला.
या उपक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेता डॉ. भगवान नारकर, गायिका निवेदिका अलका बेंदरकर, लोककलावंत लोकशाहीर श्रीकांत बोंबले, प्रकाशयोजनाकार सागर सकपाळ, कलाशिक्षक संदीप शिरतोडे, अभिनेता गिरीश शितप, सुकन्या ओळकर, समीर शिवगण या सर्वांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या नवोपक्रमासाठी डायट अधिव्याख्याता प्राध्यापिका दीपा सावंत यांनी विशेष मार्गदर्शन केले. तर झरेवाडी शाळेच्या अपग्रेड मुख्याध्यापिका आशा बगाडे, पदवीधर शिक्षिका संजीवनी यादव, उपशिक्षिका सरिता आलीम, उपशिक्षक संदीप रसाळ, उपशिक्षिका अपूर्वा काळोखे, उपशिक्षक रामनाथ बने यांचे सहकार्य लाभले.
चौकट
शिक्षण प्रेमींकडून अभिनंदन
यापूर्वी या स्पर्धेत राजेश गोसावी यांनी एक वेळा राज्यात प्रथम, पाचवा, चौथा व जिल्ह्यात ३ वेळा प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, डायट प्राचार्या निता कांबळे,गटशिक्षण अधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनुर, केंद्रप्रमुख विष्णू पवार, शालेय व्यवस्थापन समिती झरेवाडी व शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

