जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचा
अहिल्यानगरमध्ये सहकार अभ्यास दौरा

जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचा अहिल्यानगरमध्ये सहकार अभ्यास दौरा

Published on

14611

प्राथमिक शिक्षक पतपेढीचा
सहकारविषयी अभ्यास दौरा

सिंधुदुर्गनगरी, ता. ३१ ः अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार अभ्यास दौऱ्यात सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक पतपेढीने कामकाजाबाबत विविध माहिती जाणून घेतली. जिल्ह्याबाहेरील शिक्षक पतपेढी, पतसंस्थांचे कामकाज कसे चालते? त्यांनी सभासदासाठी राबविलेल्या योजना व देण्यात येत असलेले लाभ, याबाबत माहिती व्हावी यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.
या अभ्यास दौऱ्यादरम्यान संस्थेने कोपरगाव (शिर्डी, जि. अहिल्यानगर) येथील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव या संस्थेस भेट देऊन संस्थेची माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन व राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची भेट घेत पतसंस्थेची इत्यंभूत माहिती समजून घेतली. यावेळी श्री. कोयटे यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. अहिल्यानगर या संस्थेच्या कोपरगाव शाखेस भेट देत संचालक शशिकांत जेजुरकर यांच्यामार्फत संस्थेची माहिती जाणून घेतली. सातारा येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. या संस्थेस भेट देऊन संस्थेच्या चेअरमन पुष्पलता बोबडे तसेच अधिकारी वर्ग यांच्याकडून माहिती घेण्यात आली. यावेळी राज्य शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे उपस्थित होते. दि कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. कोल्हापूर या संस्थेच्या मलकापूर शाखेस भेट देऊन संस्थेची माहिती घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्ष महेंद्र पावसकर, संचालक सर्वश्री संतोष मोरे, नारायण नाईक, विजय सावंत, दयानंद नाईक, संतोष राणे, श्रीकृष्ण कांबळी, मंगेश कांबळी, सीताराम लांबर, सचिन बेर्डे, किशोर कदम, मनोज सावळ, लक्ष्मण कसाबले, गुरुप्रसाद दळवी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com