रत्नागिरी-टुडे पान १ साठी, संक्षिप्त
वित्त पुरवठा
आराखडा जाहीर
रत्नागिरी ः जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक व जिल्हास्तरीय समिक्षा समितीची तिमाही बैठक जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, आरबीआय एलडीओ बेनजीर शेख, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, नाबार्डचे महेश टिळेकर, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर, कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले आणि सर्व विभाग प्रमुख व सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. सप्टेंबर सहामाहीत सर्व बँकांनी कृषी कर्ज वितरण, शैक्षणिक कर्ज वितरण, मुद्रा कर्ज वितरण यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत अतिशय चमकदार कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी जिंदल यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी सर्व शासकीय विभागांनी योजनांचा आढावा सादर केला. यामध्ये भारतीय रिझर्व बँकेचे एलडीओ बेनजीर शेख यांनी विविध विषयांवर माहिती दिली. त्यानंतर श्री. टिळेकर यांनी एआयएफ योजनेची माहिती दिली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांच्या हस्ते संभाव्य वित्तपुरवठा आराखडा २०२६-२७ चे अनावरण करण्यात आले. यामध्ये नाबार्डकडून ५ हजार २८३ कोटींचा वित्त पुरवठा आराखडा जाहीर करण्यात आला. त्यामध्ये कृषी तसेच प्राथमिकता विभागाला करण्यात आलेल्या वित्तपुरवठा प्रगतीमध्ये पीक कर्ज वितरणाचा आढावा सादर केला. या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठी २ हजार ४३७ कोटी, सूक्ष्म व लघु क्षेत्रासाठी १ हजार ८७५ कोटी, प्राथमिकता क्षेत्रासाठी ९७० कोटीची विभागणी करण्यात आली आहे.
--------
रत्नागिरीत ५ ला
लोकशाही दिन
रत्नागिरी ः जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. जानेवारीचा लोकशाही दिन ५ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ या कालावधीत होणार आहे. लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे.
-----------
आकर्षक क्रमांकासाठी
अर्जाचे आवाहन
रत्नागिरी ः उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २ जानेवारीला दुचाकी वाहनांसाठी एमएच-८-बीएल-०००१ ते एमएच-०८-बीएल-९९९९ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्या दुचाकी, चारचाकी, परिवहन वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क भरुन हवे असतील त्यांनी २ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत विहीत नमुन्यात अर्ज करावा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात इच्छुकांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. हा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास सुलभतेने तो मिळावा यासाठी सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी आपला अर्ज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात जमा करावयाचे आहेत.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

