कलमठमध्ये ‘समृद्ध पंचायतराज’
14712
कलमठमध्ये ‘समृद्ध पंचायतराज’
स्पर्धांमध्ये यश; बीडीओंच्या हस्ते बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२ : कलमठ (ता.कणकवली) ग्रामपंचायतीतर्फे २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘समृद्ध पंचायतराज महोत्सव’ साजरा करण्यात आला. याअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविले. यात विविध स्पर्धांतील विजेत्यांना गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले.
महोत्सवात स्वच्छ स्मशानभूमी, स्वच्छ संकुल, नगर कॉलनी स्पर्धा, स्वच्छ वाडी स्पर्धा, प्रबोधनपर पथनाट्य, शालेय स्तरावर ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ स्पर्धा तसेच स्वच्छता व ग्रामीण विकासावर आधारित फुगडी असे विविध उपक्रम राबविले. या अंतर्गत ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यातील पहिली आणि दुसरी या गटामध्ये प्रथम - ओवी गोठणकर (कुंभारवाडी), द्वितीय - सारा दावर (गावडेवाडी), तृतीय - अध्या राणे (कलमठ बाजारपेठ) आणि चौथा क्रमांक राज घाडीगावकर (कुंभारवाडी) यांना देण्यात आला. तिसरी आणि चौथीच्या गटात प्रथम - संकेत देसाई (कुंभारवाडी), द्वितीय - रुही पाटील (कलमठ बाजारपेठ), तृतीय - पियुष पवार (गावडेवाडी) आणि चौथा क्रमांक आराधना लोदी (गावडेवाडी). पाचवी ते सातवी या गटामध्ये प्रथम-नमिष चिंदरकर (कुंभारवाडी), द्वितीय - वैभवी घाडीगावकर (कुंभारवाडी), तृतीय - वेदांगी घाडीगावकर (कुंभारवाडी) आणि चौथा क्रमांक स्वाती जाधव (कलमठ बाजारपेठ) यांना देण्यात आला.
सहाय्यक गटविकास अधिकारी तेजश्री गायकवाड, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर तसेच स्वप्नील चिंदरकर, नितीन पवार, अनुप वारंग, सचिन खोचरे, स्वाती नारकर, सुप्रिया मेस्त्री, श्रेयस चिंदरकर, रवींद्र यादव, नजराना शेख, गुरु वर्देकर, आबा कोरगावकर, तेजस लोकरे, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर उपस्थित होते.
---
कोट
कलमठ गावातील प्रत्येक घटक समृद्ध पंचायतराज अभियानात मेहनतीने सहभागी होत असल्याने सर्व स्पर्धांमध्ये संघटितपणे काम करणे सुलभ झाले.
- संदीप मेस्त्री, सरपंच, कलमठ
---
ग्रामपंचायतीचे उपक्रम नाविन्यपूर्ण आहेत. ग्रामपंचायत नियोजनबद्ध पद्धतीने विविध उपक्रम राबवते. ग्रामस्थांचाही उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो.
- अरुण चव्हाण, गटविकास अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

