-पाटाच्या पाण्यावर फुलवला भाजीपाल्याचा मळा
-rat३१p२२.jpg-
२५O१४७०३
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले येथे प्रगत शेतकरी प्रसाद हळदवणेकर यांच्या प्रक्षेत्रामध्ये लागवड करण्यात आलेले कुळीथ व भाजीपाला.
---
पाटाच्या पाण्यावर फुलवला भाजीपाल्याचा मळा
डोर्लेतील हळदवणेकर यांचा यशस्वी प्रयोग ; कुळथाचीही लागवड, गावातच विक्री
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १ ः शासनाकडून सध्या मोफत धान्य मिळत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण देऊन अनेक शेतकरी भातशेतीकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र पारंपरिक भातशेतीबरोबर उन्हाळी भाजीपाल्यातून रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले येथील शेतकरी प्रसाद हळदवणेकर यांनी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.
हापूस आंबा-काजू कलमे व नारळ पोपळी यांचे उत्पन्न घेतात. तसेच सुमारे २० ते २५ गुंठ्यांमध्ये भातशेती केली जाते. दरवर्षी भातशेतीच्या माध्यमातून वीस गुंठ्यामध्ये सुमारे चौदाशे ते पंधराशे किलो तांदूळ याचे उत्पन्न मिळते. त्यामुळे बाहेरून घेण्याची पाळी येत नाही, असे हळदवणेकर यांनी सांगितले. भातशेती कापून झाल्यानंतर त्याच प्रदेशांमध्ये दरवर्षी मुळा, लाल पालक, फरसबी, घेवडा, मका, वाल, चवळी तसेच कुळीथ लागवड केली आहे. यासाठी शेणखताचा वापर करून त्याची मशागत केली आहे. विहिरीचे पाणी वापरले जाते. त्याचबरोबर स्थानेश्वर मंदिराजवळ असलेल्या झऱ्याच्या माध्यमातून पाटाचे पाणी या परिसरामध्ये फिरत असल्याने त्या पाण्याचा उपयोग भाजीपाला लागवडीसाठी होतो. त्यामुळे भाजीपाला लागवडीतून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे लोकांना ताजे व सेंद्रिय भाजीपाला व कुळीथ उपलब्ध करून दिला जातो. भाजीची विक्री गावामध्ये होत असल्याने शहरातील बाजारपेठेत जाण्याची वेळ येत नाही.
कोट ः
भाजीपाला लागवडीतून चांगले उत्पन्न मिळत असून खर्चवजा सुमारे ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न मिळते. प्रक्षेत्रामध्ये जमीन सुपीक असल्याने त्याला पाणीही जवळ असल्याने चांगले उत्पन्न मिळते.
प्रसाद हळदवणेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

