श्रमसंस्कार शिबिरातून श्रमदान, समाजप्रबोधन
rat१p१.jpg-
P२६O१४८३१
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिरात स्वच्छता करणारे विद्यार्थी.
----
शिबिरातून श्रमदान, समाजप्रबोधन
देव, घैसास महाविद्यालय ; फणसोपमध्ये स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागांतर्गत फणसोप येथील श्रमसंस्कार निवासी शिबिरात श्रमदान, समाजप्रबोधन, आरोग्यजागृती, पर्यावरण संवर्धनवर आधारित विविध उपक्रम राबवण्यात आले.
शिबिरात स्वयंसेवकांनी नलावडेवाडी येथील नदीवर श्रमदानातून बंधारा उभारला. पावसाळ्यानंतर नदीतील पाणी अडवून भूजलपातळी वाढवण्याच्या उद्देशाने दगडमाती व गोण्यांच्या सहाय्याने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाची दखल घेत फणसोप गावच्या सरपंच राधिका साळवी व ग्रामपंचायत अधिकारी सदानंद शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन स्वयंसेवकांचे कौतुक केले. त्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पूजा माने यांनी स्वयंसेवक व ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
युवा रंगकर्मी सुयोग बेंडल यांनी पथनाट्याच्या माध्यमातून समाजप्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे तंत्र स्पष्ट केले. श्वेता जोगळेकर यांनी वारली चित्रकलेची ओळख करून देत स्वयंसेवकांकडून प्रत्यक्ष चित्रे रेखाटून घेतली.
विद्यार्थ्यांनी फणसोप येथील अंगणवाडी, प्राथमिक शाळा व बौद्धविहार परिसराची स्वच्छता केली. नंतर जुवी फणसोप येथील श्री दत्तमंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. सायबरतज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांनी सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केले.

