मेर्वीत भगवती देवीचा यात्रोत्सव आजपासून
- rat१p८.jpg-
२६O१४८४०
रत्नागिरी ः तालुक्यातील मेर्वी येथील जागृत देवस्थान भगवतीदेवी.
(छाया ः दिनेश पेटकर, गावखडी)
-----
भगवती देवीचा आजपासून यात्रोत्सव
मेर्वीत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम ; भाग्यवान महिलेला पैठणी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १ ः रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी (भुतेवाडी) येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी जागृत देवता म्हणून परिचित असलेल्या श्री भगवती देवीचा वार्षिक यात्रोत्सव उद्यापासून (ता. २) मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
शुक्रवारी सकाळी मंगलमय वातावरणात देवीच्या मुखवट्यांची विधिवत पूजा करून देव्हारा सजवला जाणार आहे. त्यानंतर हा देव्हारा भक्तगणांच्या दर्शनासाठी मुख्य मंडपात आणला जाईल. देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. यात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री भगवतीदेवी ग्रामस्थ मंडळ, शुक्रवारी दुपारी ३ वा. महिला मंडळाचा हळदीकुंकू आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे भाग्यवान महिला निवडली जाणार असून, तिला देवीच्या मानाची पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रात्री ८ वा. क्रिकेट स्पर्धा आणि शालेय स्पर्धांमधील विजेत्यांना ग्रामस्थ मंडळाच्यावतीने बक्षीस देऊन गौरवण्यात येईल तसेच रात्री १२ वा. भुतेवाडीतील भाऊबंदकीच्यावतीने देवीचा पारंपरिक ‘गोंधळ’ घातला जाईल. रात्री १२:३० वा. भाविकांच्या मनोरंजनासाठी ‘कांतारा २’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, या यात्रोत्सवामुळे मेर्वी परिसरात मोठी आर्थिक उलाढाल होते. यात्रेच्या निमित्ताने पूजासाहित्य, देवीची ओटी, खेळणी, प्रसाद आणि खाद्यपदार्थांची अनेक दुकाने थाटली जातात. श्री भगवती देवीच्या दर्शनाचा आणि सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र भुते, उपाध्यक्ष दीपक भुते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

